इराणचा अमेरिकेला दोन-टप्प्यांचा शांतता प्रस्ताव
तेहरान , 27 एप्रिल (हिं.स.)।पश्चिम आशियात सुरू असलेल्या तणावपूर्ण परिस्थिती आणि शांतता चर्चेला लागलेल्या खीळीदरम्यान इराणने अमेरिकेला नवा दोन-टप्प्यांचा शांतता प्रस्ताव पाठवला आहे. हा प्रस्ताव पाकिस्तानी मध्यस्थांच्या माध्यमातून वॉशिंग्टनपर्यंत पोह
इराणचा अमेरिकेला दोन-टप्प्यांचा शांतता प्रस्ताव


तेहरान , 27 एप्रिल (हिं.स.)।पश्चिम आशियात सुरू असलेल्या तणावपूर्ण परिस्थिती आणि शांतता चर्चेला लागलेल्या खीळीदरम्यान इराणने अमेरिकेला नवा दोन-टप्प्यांचा शांतता प्रस्ताव पाठवला आहे. हा प्रस्ताव पाकिस्तानी मध्यस्थांच्या माध्यमातून वॉशिंग्टनपर्यंत पोहोचवण्यात आला असून, त्यात सर्वप्रथम होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा खुली करण्याची आणि प्रादेशिक युद्ध थांबवण्याची मागणी करण्यात आली आहे. अमेरिकन वृत्तसंस्थाच्या माहितीनुसार, इराणला अणु विषयांवरील चर्चा पुढील टप्प्यात घ्यायची आहे.

इराणच्या प्रस्तावित दोन-टप्प्यांच्या योजनेनुसार, पहिल्या टप्प्यात होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा सुरू करणे आणि अमेरिकेची नाकेबंदी संपवणे यावर भर देण्यात आला आहे. त्यानंतर युद्धविराम किंवा कायमस्वरूपी शांतता कराराचा मुद्दा आहे. अणु कार्यक्रमासंदर्भातील औपचारिक चर्चा त्यानंतर सुरू करण्याचा प्रस्ताव आहे. हा प्रस्ताव पाकिस्तान आणि ओमानमार्फत अमेरिकेकडे पाठवण्यात आला आहे.रशिया, ओमान आणि पाकिस्तान यांसारखे देश मध्यस्थीचे प्रयत्न करत आहेत. दरम्यान, अमेरिका या नव्या प्रस्तावाचा विचार करत असली तरी तिची अंतिम भूमिका अद्याप स्पष्ट झालेली नाही.

अमेरिकेने इराणसमोर काही कठोर अटी ठेवल्या आहेत. त्यामध्ये किमान १० वर्षे युरेनियम संवर्धन थांबवणे, विद्यमान अणु सामग्री देशाबाहेर पाठवणे, क्षेपणास्त्र कार्यक्रम थांबवणे आणि प्रादेशिक गटांना दिला जाणारा पाठिंबा समाप्त करणे यांचा समावेश आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या धोरणानुसार, इराणला कोणत्याही परिस्थितीत अण्वस्त्र मिळवण्याची परवानगी दिली जाणार नाही.

इराण आणि अमेरिका यांच्यात सुरू असलेली चर्चा सध्या ठप्प पडल्याचे दिसत आहे. अहवालानुसार, अमेरिकन चर्चाप्रतिनिधींचा पाकिस्तान दौरा रद्द झाल्यानंतर वॉशिंग्टन इराणच्या सुरुवातीच्या प्रस्तावाशी सहमत नसल्याचे संकेत मिळाले. दुसरीकडे, इराणचे परराष्ट्रमंत्री अब्बास अराघची यांनीही स्पष्ट केले आहे की, देशांतर्गत या मुद्द्यावर अजून एकमत झालेले नाही. दोन्ही बाजूंतील वाढते मतभेद आणि असहमतीमुळे शांतता चर्चा पुढे जाण्याऐवजी अधिक गुंतागुंतीची होत चालली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande