ऑस्ट्रेलियामध्ये विमान हँगरला धडकल्याने अपघात; दोघांचा मृत्यू
कॅनबेरा , 29 एप्रिल (हिं.स.)।दक्षिण ऑस्ट्रेलियातील ॲडलेड येथे पॅराफील्ड विमानतळावर लँडिंग करण्याचा प्रयत्न करत असताना एक विमान हॅंगरला धडकले. यानंतर विमानाला भीषण आग लागली आणि दोन जणांचा मृत्यू झाला. ऑस्ट्रेलियातील स्थानिक मीडिया वृत्तानुसार, या अ
ऑस्ट्रेलियामध्ये विमान हँगरला धडकल्याने अपघात; दोघांचा मृत्यू


कॅनबेरा , 29 एप्रिल (हिं.स.)।दक्षिण ऑस्ट्रेलियातील ॲडलेड येथे पॅराफील्ड विमानतळावर लँडिंग करण्याचा प्रयत्न करत असताना एक विमान हॅंगरला धडकले. यानंतर विमानाला भीषण आग लागली आणि दोन जणांचा मृत्यू झाला.

ऑस्ट्रेलियातील स्थानिक मीडिया वृत्तानुसार, या अपघातात पायलट आणि एका प्रवाशाचा मृत्यू झाला. तर 11 इतर जण गंभीर जखमी झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातानंतर पोलिसांनी निवेदनात म्हटले की, “आजूबाजूचा परिसर रिकामा करण्यात आला असून, आपत्कालीन सेवा पथके घटनास्थळी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी काम करत आहेत.”

पोलिसांनी पुढे सांगितले की, एका व्यक्तीला जीवघेण्या स्वरूपाच्या दुखापती झाल्या असून त्याला रुग्णालयात नेण्यात आले आहे. तर अन्य दोन जण गंभीर जखमी झाले असून एका व्यक्तीला किरकोळ दुखापत झाली आहे. याशिवाय सहा जणांनी धूर श्वासावाटे घेतल्याने त्यांची प्रकृती बिघडली आहे.

स्थानिक मीडियाच्या वृत्तानुसार, मुख्य निरीक्षक अँड्र्यू मॅकक्रॅकन यांनी सांगितले की, “उड्डाण केल्यानंतर काही वेळातच विमानात बिघाड झाला. त्यामुळे आपत्कालीन लँडिंगचा प्रयत्न करण्यात आला. मात्र त्याचदरम्यान विमानतळावरील हॅंगर 54 ला विमान धडकले.” धडकेनंतर विमानाला आग लागली आणि हॅंगरमधून निघालेला दाट काळा धूर आसपासच्या परिसरात पसरला. सध्या मेट्रोपॉलिटन फायर सर्व्हिसने नागरिकांना घरातच राहण्याचा सल्ला दिला आहे.

दरम्यान, ऑस्ट्रेलियन ट्रान्सपोर्ट सेफ्टी ब्युरोने या अपघाताची चौकशी सुरू केली असून, या दुर्घटनेत दोन इंजिन असलेले डायमंड डीए42 विमान सहभागी असल्याचे सांगितले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande