इस्रायल-लेबनॉन युद्ध पुन्हा सुरू; हिजबुल्लाहचा इस्रायली सैनिकांवर ड्रोन हल्ला
बेरूत , 27 एप्रिल (हिं.स.)।इस्त्रायल आणि हिजबुल्लाह यांच्यात पुन्हा एकदा युद्ध भडकले आहे. हिजबुल्लाहने दक्षिण लेबनॉनमध्ये आपल्या एफपीव्ही ड्रोनच्या मदतीने इस्त्रायली सैनिकांच्या ताफ्यावर मोठा हल्ला केला आहे. या हल्ल्यानंतर इस्त्रायली सैनिकांमध्ये ग
Israel-Lebanon war resumes


बेरूत , 27 एप्रिल (हिं.स.)।इस्त्रायल आणि हिजबुल्लाह यांच्यात पुन्हा एकदा युद्ध भडकले आहे. हिजबुल्लाहने दक्षिण लेबनॉनमध्ये आपल्या एफपीव्ही ड्रोनच्या मदतीने इस्त्रायली सैनिकांच्या ताफ्यावर मोठा हल्ला केला आहे. या हल्ल्यानंतर इस्त्रायली सैनिकांमध्ये गोंधळ उडाल्याचे आणि आरडाओरडा झाल्याचे दिसून आले. मात्र, ड्रोन आपल्या खऱ्या लक्ष्यावर आदळण्यात अपयशी ठरला.

हिजबुल्लाहने या ड्रोन हल्ल्यात इस्त्रायलच्या सैनिकांना आणि लष्करी वाहनांना लक्ष्य केल्याचा दावा केला आहे. हा हल्ला दक्षिण लेबनॉनमध्ये इस्त्रायली सैन्याच्या मेडिकल इव्हॅक्युएशन मोहिमेदरम्यान करण्यात आला. हिजबुल्लाहने एफपीव्ही (फर्स्ट पर्सन व्ह्यू) ड्रोनचा वापर केला.

व्हायरल झालेल्या क्लोज फुटेजमध्ये ड्रोन सैनिक आणि हेलिकॉप्टरच्या अत्यंत जवळून जाताना दिसत आहे, मात्र तो लक्ष्य चुकवतो. व्हिडिओमध्ये दिसते की, इस्त्रायली सैनिक आपल्या जखमी सहकाऱ्यांना हेलिकॉप्टरमधून बाहेर काढत होते. त्याचवेळी हिजबुल्लाहचा एफपीव्ही ड्रोन वेगाने त्यांच्या दिशेने आला.सैनिकांनी तत्काळ ड्रोनवर गोळीबार सुरू केला. एक ड्रोन हवेतच पाडण्यात आला, तर दुसरा ड्रोन हेलिकॉप्टर आणि सैनिकांच्या अगदी जवळून जात शेजारील जमिनीवर जाऊन फुटला.

हिजबुल्लाहने या हल्ल्याचे फुटेज प्रसिद्ध करत त्याला यशस्वी कारवाई म्हटले, मात्र इस्त्रायली बाजूच्या मते हा हल्ला अयशस्वी ठरला. या घटनेत कोणत्याही इस्त्रायली सैनिकाचा मृत्यू किंवा गंभीर जखमी झाल्याची पुष्टी झालेली नाही.

रॉकेटनंतर एफपीव्ही ड्रोन हे हिजबुल्लाहचे प्रमुख शस्त्र बनले आहे. हे छोटे, वेगवान आणि स्वस्त ड्रोन असून, युक्रेन-रशिया युद्धाच्या धर्तीवर त्यांचा वापर केला जात आहे. हिजबुल्लाहचा दावा आहे की, या ड्रोनद्वारे इस्त्रायली रणगाडे, वाहने आणि सैनिकांना नुकसान पोहोचवले जात आहे.

इस्त्रायल डिफेन्स फोर्सेस (IDF) ने दक्षिण लेबनॉनमध्ये आपली कारवाई सुरूच ठेवली आहे. दोन्ही बाजूंनी ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ले सातत्याने सुरू असून, अशा हल्ल्यांमध्ये अनेकदा लक्ष्य चुकणे किंवा हल्ले हवेतच निष्फळ ठरण्याच्या घटना समोर येत आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande