इस्रायल-हिजबुल्ला संघर्ष पुन्हा पेटला ; इस्रायलचा लेबनानवर हल्ला
जेरुसलेम , 28 एप्रिल (हिं.स.)।युद्धविराम लागू असतानाही सोमवारी इस्रायलने लेबनानच्या पूर्व भागावर हल्ला केला. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पुढाकाराने १६ एप्रिल रोजी लागू झालेल्या युद्धविरामानंतर इस्रायली सैन्य आणि हिजबुल्ला लढवय्य
इस्रायल-हिजबुल्ला संघर्ष पुन्हा पेटला ; इस्रायलचा लेबनानवर हल्ला


जेरुसलेम , 28 एप्रिल (हिं.स.)।युद्धविराम लागू असतानाही सोमवारी इस्रायलने लेबनानच्या पूर्व भागावर हल्ला केला. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पुढाकाराने १६ एप्रिल रोजी लागू झालेल्या युद्धविरामानंतर इस्रायली सैन्य आणि हिजबुल्ला लढवय्यांमधील संघर्ष थांबला होता. मात्र, मागील युद्धविरामांप्रमाणे यावेळीही ही शांतता काही दिवसच टिकू शकली.

हिजबुल्लाचा प्रभाव असलेल्या दक्षिण लेबनानऐवजी इस्रायलचा ताजा हल्ला पूर्वेकडील बेका खोऱ्यात करण्यात आला. इस्रायली सैन्याच्या प्रवक्त्याने सांगितले की, बेका खोऱ्यातील हिजबुल्लाच्या तळांवर हल्ल्यांची ही सुरुवात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, या हल्ल्यात सीरिया सीमेजवळील नबी चित शहराला लक्ष्य करण्यात आले. तेथे अनेक ठिकाणी बॉम्बहल्ले करण्यात आले. या हल्ल्यात कोणाचाही मृत्यू झाल्याची माहिती नाही.

दरम्यान, इस्रायली सैन्याने दक्षिण लेबनानमध्ये अनेक किलोमीटर आतपर्यंत घुसखोरी करून तेथील भूभागाच्या पट्टीवर ताबा मिळवला आहे आणि त्याच ठिकाणाहून हल्ले सुरू ठेवले आहेत. त्याला प्रत्युत्तर म्हणून हिजबुल्लाकडून लेबनान सीमेलगत तैनात इस्रायली सैनिकांवर तसेच उत्तर इस्रायलवर ड्रोन आणि रॉकेट हल्ले करण्यात येत आहेत. ताज्या हल्ल्यांमध्ये हिजबुल्लाच्या ड्रोन हल्ल्यात इस्रायलचा एक रणगाडा लक्ष्य झाल्याची माहिती आहे.

युद्धविराम भंगल्यानंतर लेबनानचे राष्ट्राध्यक्ष जोसेफ आउन यांनी सरकारच्या भूमिकेचे समर्थन केले आहे. त्यांनी देशात शांततेला पाठिंबा असल्याचे सांगितले. तसेच अशांततेसाठी नाव न घेता हिजबुल्लालाच जबाबदार धरले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande