पंजाबमध्ये रेल्वे ट्रॅकवर स्फोट; दहशतवादी कटाचा संशय, बॉम्ब लावणाऱ्याचाच मृत्यू
चंदीगड, 28 एप्रिल (हिं.स.)। पंजाबमधील पटियाळा जिल्ह्यातील राजपुरा-शंभू दरम्यान अंबाला-अमृतसर रेल्वे फ्रेट कॉरिडॉरवर सोमवारी रात्री सुमारे साडेआठच्या सुमारास कमी तीव्रतेचा स्फोट घडला असून, या घटनेमागे दहशतवादी कटाचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. रेल्
PB Railway Tracks bomb blast Patiala Terrorist Conspiracy Suspected Bomber Himself Killed


PB Railway Tracks bomb-blast Patiala Terrorist Conspiracy Suspected Bomber Himself Killed


PB Railway Tracks bomb blast Patiala Terrorist Conspiracy Suspected Bomber Himself Killed


चंदीगड, 28 एप्रिल (हिं.स.)। पंजाबमधील पटियाळा जिल्ह्यातील राजपुरा-शंभू दरम्यान अंबाला-अमृतसर रेल्वे फ्रेट कॉरिडॉरवर सोमवारी रात्री सुमारे साडेआठच्या सुमारास कमी तीव्रतेचा स्फोट घडला असून, या घटनेमागे दहशतवादी कटाचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. रेल्वेच्या विशेष पोलीस महासंचालक शशी प्रभा द्विवेदी यांनी मंगळवारी घटनास्थळी भेट देऊन प्राथमिक तपासात पाकिस्तानचा हात असण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे सांगितले. स्फोटाच्या वेळी त्या मार्गावरून मालगाडी जात होती, मात्र सुदैवाने गाडीला कोणतेही मोठे नुकसान झाले नाही. मात्र, चालकाला मोठा धक्का बसला असून त्यानेच रुळांवर काहीतरी संशयास्पद घडल्याची माहिती अधिकाऱ्यांना दिली.

या स्फोटात रेल्वे रुळ आणि स्लीपरचे नुकसान झाले असून दुरुस्तीचे काम सुरू आहे. तपासादरम्यान घटनास्थळी सापडलेला मृतदेह हा स्फोट घडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीचाच असल्याचा अंदाज आहे. पटियाळाचे एसएसपी वरुण शर्मा यांनी मृताची ओळख जगरूप सिंग (रहिवासी पंजवार, जिल्हा तरनतारन) अशी पटवून दिली आहे. त्याच्या खिशातून सरहिंद ते राजपुरा रेल्वे तिकीट, मोबाईल आणि इतर पुरावे जप्त करण्यात आले असून त्याच्या कॉल डिटेल्सची तपासणी सुरू आहे. तसेच अमृतसरमध्ये त्याने दुचाकी पार्क केल्याचा व्हिडिओही पोलिसांना मिळाला असून ती दुचाकी जप्त करण्यात आली आहे.

विशेष डीजीपी द्विवेदी यांनी सांगितले की, स्फोटाच्या वेळी बॉम्ब लावणारा व्यक्ती घटनास्थळाजवळच उभा होता आणि स्फोटाच्या तडाख्यात तो ठार झाला असावा. स्फोटानंतर साधारण एक तासाने पोलिसांना माहिती मिळाली आणि त्यानंतर तात्काळ तपास पथके घटनास्थळी दाखल झाली. या प्रकरणी दोन संशयितांना अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी खालिस्तान नॅशनल आर्मीने पंजाब आणि हरियाणातील रेल्वे ट्रॅक उडवण्याची धमकी दिली होती. या पार्श्वभूमीवर ही घटना अधिक गंभीर मानली जात आहे. यापूर्वी २३ जानेवारी रोजी सरहिंदजवळील खानपूर येथेही अशाच प्रकारचा स्फोट झाला होता. या घटनेनंतर राज्यातील कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून राजकीय नेत्यांनी सरकारवर टीका केली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande