
सीमे पलीकडे चालवण्यात येणाऱ्या दहशतवादी मॉड्यूलचा भांडाफोड, मलेशियात बसलेल्या हँडलर्सशी होता सतत संपर्क
चंदीगड, 28 एप्रिल (हिं.स.)। पंजाबमधील शंभू येथे काल रात्री रेल्वे ट्रॅकवर झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणात पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे. त्यांच्या ताब्यातून मोठ्या प्रमाणात शस्त्रे आणि दारुगोळा जप्त करण्यात आला आहे. यासोबतच पाकिस्तानच्या गुप्तचर संस्था (आयएसआय) च्या इशाऱ्यावर पंजाबमध्ये चालवण्यात येणाऱ्या दहशतवादी मॉड्यूलचा भांडाफोड करण्यात आला आहे.
पोलीस उपमहानिरीक्षक यांनी सांगितले की, मानसा येथील परदीप सिंग खालसा, मानसा जिल्ह्यातील बप्पियाना येथील कुलविंदर सिंग बग्गा, तरणतारण जिल्ह्यातील पंजवड येथील सतनाम सिंग सत्ता आणि तरणतारण जिल्ह्यातील गुरप्रीत सिंग उर्फ गोपी यांना अटक करण्यात आली आहे. प्राथमिक चौकशीत असेही समोर आले आहे की, २७ एप्रिलच्या रात्री सुमारे ८:५५ वाजता त्यांच्या साथीदारांनी शंभू-अंबाला रेल्वे मार्गावर बॉम्बस्फोट करून रेल्वे ट्रॅकचे नुकसान केले. या संदर्भात जीआरपी पोलीस ठाणे पटियाला येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पटियाला रेंजचे पोलीस उपमहानिरीक्षक कुलदीप सिंग चाहल आणि जिल्हा पोलीस प्रमुख वरुण शर्मा यांनी मंगळवारी पटियाला येथे पत्रकार परिषदेत सांगितले की, शंभू-अंबाला रेल्वे मार्गावर झालेल्या बॉम्बस्फोटाची उकल करण्यासाठी पोलीस अधीक्षक (एच) वैभव चौधरी यांच्या देखरेखीखाली पोलीस उपअधीक्षक सुखअमृत सिंग रंधावा, सीआयए पटियाला चे प्रभारी निरीक्षक प्रदीप सिंग बाजवा, सीआयए समाना चे प्रभारी निरीक्षक अंकुरदीप सिंग, कोतवाली पटियाला पोलीस ठाण्याचे एसएचओ निरीक्षक जसप्रीत सिंग काहलो तसेच स्पेशल सेल राजपुरा चे प्रभारी एसआय मनप्रीत सिंग यांच्या पथकांची स्थापना करण्यात आली होती.
पोलीस उपमहानिरीक्षक यांनी सांगितले की, अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून मोठ्या प्रमाणात युद्धसदृश शस्त्रे आणि दारुगोळा जप्त करण्यात आला आहे, जे त्यांनी सीमे पलीकडे बसलेल्या त्यांच्या दहशतवादी हँडलर्सच्या मदतीने मिळवले होते. जप्त केलेल्या सामग्रीमध्ये एक बॉम्ब, दोन पिस्तुलांसह जिवंत काडतुसे, आयईडी तयार करण्यासाठी वापरली जाणारी सामग्री तसेच मलेशियात बसलेल्या हँडलर्सशी संपर्क साधण्यासाठी वापरला जाणारा लॅपटॉप आणि इतर तांत्रिक उपकरणांचा समावेश आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींचा गुन्हेगारी रेकॉर्डही आहे आणि त्यांच्या विरोधात विविध प्रकरणांमध्ये गुन्हे दाखल आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule