छत्तीसगडमधील अवैध धर्मांतरणाची चौकशी; ईडीकडून तपास सुरू
राजनांदगाव, 28 एप्रिल (हिं.स.) : छत्तीसगड राज्यातील राजनांदगाव जिल्ह्यात अवैध धर्मांतरणाच्या प्रकरणांबाबत तपास यंत्रणा सतर्क झाली असून अंमलबजावणी संचनालय (ईडी) या प्रकरणाची चौकशी करत आहे. या संदर्भात डेविड चाको नावाच्या व्यक्तीचा तपास सुरू असून त्य
प्रतिकात्मक फोटो


राजनांदगाव, 28 एप्रिल (हिं.स.) : छत्तीसगड राज्यातील राजनांदगाव जिल्ह्यात अवैध धर्मांतरणाच्या प्रकरणांबाबत तपास यंत्रणा सतर्क झाली असून अंमलबजावणी संचनालय (ईडी) या प्रकरणाची चौकशी करत आहे. या संदर्भात डेविड चाको नावाच्या व्यक्तीचा तपास सुरू असून त्याचे संबंध परदेशातील एका संस्थेशी असल्याची माहिती समोर आली आहे.

माहितीनुसार, राजनांदगाव जिल्ह्यातील काही भागांमध्ये धार्मिक कार्याच्या माध्यमातून लोकांशी संपर्क साधला जात जात आहे. काही स्थानिक संघटनांनी असा आरोप केला आहे की आर्थिक किंवा सामाजिक मदतीच्या माध्यमातून लोकांना प्रभावित करण्याचा प्रयत्न होत आहे. स्थानिक आदिवासी नेते आणि काही सामाजिक संघटनांनी या घडामोडींवर चिंता व्यक्त केली असून प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी केली आहे. विशेषतः दुर्गम भागांमध्ये ख्रिस्ती धर्मियांच्या सभा आणि कार्यक्रम आयोजित केले जात असल्याची माहिती समोर येत आहे.

दुसरीकडे, या प्रकरणात विविध स्तरांवरून भिन्न प्रतिक्रिया उमटत आहेत. काहींनी हे आरोप फेटाळले असून धार्मिक स्वातंत्र्याचा मुद्दा उपस्थित केला आहे. त्यामुळे या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होणे आवश्यक मानले जात आहे.

ईडीने संबंधित आर्थिक व्यवहार, निधीचा स्रोत आणि त्याचा वापर यांचा तपास सुरू ठेवला असून पुढील तपासानंतरच संपूर्ण चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे. प्रशासनाने नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीकडे लक्ष देण्याचे आवाहन केले आहे.

--------------------------------

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande