
सोलापूर, 28 एप्रिल (हिं.स.)। भारतीय जनता पार्टीला सोलापूर शहरात महानगरपालिका जिल्ह्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत मिळालेल्या ऐतिहासिक यशानंतर पहिल्यांदाच देवेंद्र फडणवीस सोलापूर दौऱ्यावर आले होते त्यांच्या उपस्थितीत कृतज्ञता आणि विजय संकल्प मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
आपल्या भाषणाच्या सुरुवातीलाच मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, मी हात जोडून नमन करेन की, सोलापूर जिल्ह्यातल्या जनतेने भारतीय जनता पार्टी पक्षावर ऐतिहासिक विश्वास दाखवला आहे. खरोखरच सोलापूरकरांना मी सांगू इच्छितो, आम्ही तुमच्या कर्जात आहोत. हे कर्ज विकासाच्या माध्यमातून फेडण्याचा प्रयत्न करणार, तुमच्या प्रेमाच्या कर्जात तर जन्मभर राहू पण तुम्ही विकासाकरता जे कर्ज दिले ते पाच वर्षात प्रामाणिकपणे प्रयत्न करून प्रत्येक व्यक्तीच्या आशा, आकांक्षा या पूर्ण करण्याचे काम करणार आहोत.
जिल्हा परिषद सदस्य महापालिका नगरसेवक पंचायत समिती सदस्य आणि नगरपालिकेच्या नगरसेवकांना उद्देशून देवेंद्र फडणवीस म्हणाले, हा विजय विकासाचा विजय असून ज्यांचा विकासावर विश्वास आहे अशांचा विजय आहे हे लक्षात ठेवा. निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींना सांगतो माझ्यामुळे मी निवडून आलोय असा समज होतोय व्यवहार बदलत जातो लोक जसं तुमच्या विकासाकडे पडतात तसेच तुमच्या व्यवहाराकडे सुद्धा पाहतात विकास कमी झाला तरी चालेल तुमच्या व्यवहार कसा आहे हे महत्त्वाचे आहे लोकांना सन्मान मिळाला पाहिजे.
भाजपची परीक्षा ही मोदीजींनी काय काम केलंय यावर तर होणारच आहे पण त्या सोबत स्थानिक व्यवहार कसा आहे या माध्यमातून होणार आहे. कुठल्याही परिस्थितीत पारदर्शी आणि प्रामाणिकपणे काम झालं पाहिजे. कुठल्याही प्रकारचा भ्रष्टाचार आम्ही खपवून घेणार नाही, या ठिकाणी एखाद्याला पदावरून काढावं लागलं तरी हरकत नाही, पण पारदर्शी आणि प्रामाणिकपणे काम करण्यासाठी निवडून दिले आहे त्यामुळे लक्षात ठेवा, प्रत्येक गोष्टीत देवा भाऊ पाठीशी आहे पण चुकला तर, चुकीला माफी नाही या शब्दात त्यांनी तंबी दिली.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड