बीडला मिळाले अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक; नागेश चव्हाण रूजू
बीड, 03 एप्रिल (हिं.स.)। बीड जिल्हा रुग्णालयातील गेल्या दीड वर्षांपासून रिक्त असलेल्या अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक पदावर अखेर पूर्णवेळ नियुक्ती झाली आहे. बीडचे भूमिपुत्र असलेले आणि सध्या उदगीर (जि. लातूर) येथे वैद्यकीय अधीक्षक म्हणून कार्यरत असले
बीडला मिळाले अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक; नागेश चव्हाण रूजू


बीड, 03 एप्रिल (हिं.स.)।

बीड जिल्हा रुग्णालयातील गेल्या दीड वर्षांपासून रिक्त असलेल्या अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक पदावर अखेर पूर्णवेळ नियुक्ती झाली आहे. बीडचे भूमिपुत्र असलेले आणि सध्या उदगीर (जि. लातूर) येथे वैद्यकीय अधीक्षक म्हणून कार्यरत असलेले डॉ. नागेश चव्हाण यांची या पदावर नियुक्ती झाली असून, गुरुवारी त्यांनी आपला पदभार स्वीकारला.

डॉ. चव्हाण यांना प्रशासकीय कामाचा मोठा अनुभव आहे. यापूर्वी त्यांनी जळगाव आणि अहिल्यानगर येथे

जिल्हा नियमित जिल्हा शल्यचिकित्सक म्हणून काम पाहिले आहे तसेच २०२४ मध्ये बीडमध्ये याच पदावर असताना त्यांनी जिल्हा शल्यचिकित्सक पदाचा अतिरिक्त कार्यभारही यशस्वीपणे सांभाळला होता. पदभार स्वीकारल्यानंतर शल्यचिकित्सक डॉ. सतीशकुमार सोळंके यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. एल. आर. तांदळे व कर्मचारी उपस्थित होते. अनुभवी आणि स्थानिक परिस्थितीची जाण असलेला अधिकारी मिळाल्याने जिल्ह्याच्या आरोग्यसेवेला आता मोठी गती मिळणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande