
पुणे, 03 एप्रिल (हिं.स.)।
भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वतीने दि.३ व ४ एप्रिल रोजी “इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन रिस्पॉन्सिबल, रिस्क अवेअर अँड रेग्युलेटेड एआय (RRRAI-2026)” या आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन ३ एप्रिल रोजी पुणे येथे जेआयएस विद्यापीठाचे प्रो-चॅन्सलर व एआयसीटीईचे माजी सल्लागार डॉ. नीरज सक्सेना यांच्या हस्ते झाले.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून टेक्नो इंटरनॅशनल न्यू टाउन येथील डॉ. नीलांजन डे, भारती विद्यापीठ मेडिकल फाउंडेशनच्या कार्यकारी संचालक डॉ. अस्मिता जगताप, कुलगुरू डॉ. विवेक सावजी, सौ. स्वप्नाली कदम, डॉ. एम. एस. सागरे, प्राचार्य डॉ. राजेश प्रसाद, उपप्राचार्य डॉ. सुनीता जाधव, डॉ. सचिन चव्हाण, डॉ. के. बी. सुतार तसेच विविध पदाधिकारी, प्राध्यापक, विद्यार्थी व सहभागी उपस्थित होते.
या दोन दिवसीय परिषदेत जगभरातील प्रमुख दहा वक्ते सहभागी झाले असून, कृत्रिम बुद्धिमत्तेतील अत्याधुनिक प्रगती, आव्हाने आणि नियामक चौकटींबाबत सखोल चर्चा करत आहेत. या परिषदेस देश-विदेशातील संशोधकांकडून ८०० हून अधिक उच्च दर्जाच्या संशोधन लेख प्राप्त झाले असून, त्यापैकी एकूण ३६८ निवडक संशोधन लेख Atlantis Press, Wiley आणि Taylor & Francis यांसारख्या नामांकित आंतरराष्ट्रीय प्रकाशनांमध्ये प्रकाशित होणार आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु