अकोल्यात रस्त्याचे आ. सावरकर यांच्या हस्ते भूमिपूजन
अकोला, 03 एप्रिल (हिं.स.) : अकोला शहरातील प्रभाग क्रमांक ६ मध्ये दुर्गा चौक ते अग्रेसन महाराज चौकापर्यंत रस्त्यांचे दोन्ही बाजूने रुंदीकरण (वाइंडिंग) कामाचे भूमिपूजन आमदार रणधीर सावरकर यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. प्रसंगी नगरसेवक, महापौर, महानगराध
Photo


अकोला, 03 एप्रिल (हिं.स.) : अकोला शहरातील प्रभाग क्रमांक ६ मध्ये दुर्गा चौक ते अग्रेसन महाराज चौकापर्यंत रस्त्यांचे दोन्ही बाजूने रुंदीकरण (वाइंडिंग) कामाचे भूमिपूजन आमदार रणधीर सावरकर यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. प्रसंगी नगरसेवक, महापौर, महानगराध्यक्ष आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

भूमिपूजन समारंभात आमदार सावरकर यांनी सांगितले की, स्वर्गीय विनयकुमार पाराशर यांनी शहरातील रस्ते मोठे करण्याचे पहिले पाऊल उचलले, त्यानंतर भारतीय जनता पक्षाने तत्कालीन खासदार संजय भाऊ धोत्रे आणि स्वर्गीय गोवर्धन शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील सर्व रस्त्यांचे रुंदीकरण आणि दळणवळणाच्या सुविधा सुधारण्याचे काम पूर्ण केले.

सावरकर म्हणाले की, भारतीय जनता पक्षाच्या पुढाकारामुळे शहरातील अविकसित भागांचा विकास झाला असून, सातत्याने नागरिकांचा विश्वास आणि प्रेम पार्टीकडे वाढत आहे. त्यांनी हेही नमूद केले की, विशेष वर्गासाठी नव्हे तर सर्वसामान्यांच्या हितासाठी नियोजन करून काम केले जात आहे.

समारंभात उपस्थित असलेल्या महानगराध्यक्ष जयंत मसने, महापौर शारदाताई खेडकर, नगरसेवक पवन भाऊ महल्ले, तसेच अन्य पदाधिकारी आणि नागरिकांनी या विकासकामाचा उत्साह व्यक्त केला.

नगरसेवक पवन महल्ले यांनी या प्रकल्पामुळे अकोला शहराला सुजलाम सुफलाम करण्याचा विश्वास व्यक्त केला आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्र्ये एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा आई पवार यांच्या नेतृत्वाखाली शहराचा सर्वांगीण विकास होईल, असे सांगितले.

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande