
छत्रपती संभाजीनगर, 03 एप्रिल (हिं.स.)। औषधशास्त्रासंबंधी नवीन अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी (इंट्रो) आणि विद्यमान अभ्यासक्रमांच्या प्रवेश क्षमतेत वाढ करण्याकरिता (राइस) अर्ज करण्यासाठी नवीन 'डीजी-फार्ड' पोर्टल सुरू करण्यात आले आहे.
हे पोर्टल वर्षभर खुले राहणार आहे. अर्ज सादर करताना कौन्सिलने निश्चित केलेल्या शैक्षणिक दिनदर्शिकचे पालन करणे बंधनकारक राहणार आहे. पुढील शैक्षणिक सत्रांसाठी स्टँडर्ड इन्स्पेक्शन फॉर्म (एसआयएफ) सादर करण्याबाबत स्वतंत्र सूचना नंतर दिल्या जाणार आहेत. फार्मसी कौन्सिल ऑफ इंडियाने स्पष्ट केले आहे, की केवळ २०२६-२७
सत्रासाठी एसआयएफ यशस्वीपणे सादर केलेल्या संस्थांनाच इंट्रो आणि राइससाठी अर्ज करता येणार आहे. ज्या संस्थांनी या सत्रासाठी अर्ज केलेला नाही, त्यांना प्रथम २०२७-२८ सत्रासाठी अर्ज करावा लागेल. त्यानंतरच त्यांच्यासाठी अर्जाची प्रक्रिया खुली होईल. अर्ज प्रक्रिया दोन टप्प्यांत पार पडणार आहे. पहिल्या टप्प्यात आवश्यक कायदेशीर व पूरक कागदपत्रे सादर करावी लागतील. हा टप्पा कौन्सिलकडून मंजूर झाल्यानंतरच दुसऱ्या टप्प्यात अतिरिक्त माहिती व कागदपत्रे सादर करण्याची संधी मिळेल.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis