
प्रमुख तीन शासकीय संस्थांमध्ये उष्माघात कक्षासह शेकडो खाटांची उपलब्धता
लातूर, 03 एप्रिल (हिं.स.)।
एप्रिल महिना नुकताच सुरू झाला असून दिवसेंदिवस तापमानाचा पारा वाढत आहे. परिणामी उन्हामुळे प्रामुख्याने नागरिकांच्या जीवाला धोका असणारा आजार म्हणजे उष्माघात. दरम्यान एप्रिल आणि मे या कडक उन्हाच्या महिन्यात होणारा उष्माघाताचा संभाव्य धोका लक्षात पाहता जिल्हा परिषद आरोग्य विभाग, सार्वजनिक आरोग्य विभाग अन् शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांनी शासकीय आरोग्य संस्था उप्पाघात आणि संबंधित जीवघेण्या आजारांना प्रतिबंध घालण्यासाठी विविध उपायोजना आखत उष्माघात रूग्णांसाठी विविध आरोग्य संस्थांमध्ये उष्माघात कक्ष स्थापन करून स्वतंत्र खाटा आरक्षित करून आवश्यक औषर्षीचा साठा उपलब्ध आहेत. लातूर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागांतर्गत येणाऱ्या ५१ प्राथमिक आरोग्य केंद्रातील उष्माघात कक्षामध्ये प्रत्येकी २ अशा १०२ खाटा उपलब्ध करण्यात आल्या आहेत.
सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत येणारे सामान्य रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालये आणि ग्रामीण रुग्णालये अशा १४ संस्थांमध्ये प्रत्येकी १ बाट प्रमाणे १४ खाटा तर लातूर शहरातील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात महिला आणि पुरुष प्रत्येकी ५/५ खाटा अशा एकूण १० खाटांची व्यवस्था उष्माघात कक्षात करण्यात आली आहे. दरम्यान,
जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रे व इतर शासकीय दवाखान्यात उन्हाळाच्या पूर्वतयारी अनुषंगाने आरोग्य विभागामार्फत मुबलक औषधी साठा उपलब्धता, वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचारी प्रशिक्षण, आरोग्य शिक्षण, जनजागृती इत्यादी उपाययोजना करण्यात आलेल्या असून ग्रामीण आरोग्य यंत्रणा सतर्क व राज ठेवण्यात आलेली आहे.
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis