
सोलापूर, 03 एप्रिल (हिं.स.)।
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यावरुन सोलापुरातल्या माढ्यात असलेल्या अंजनगाव येथे तणाव निर्माण झाला आहे. त्यातच आता हाकेंनी ठिय्या आंदोलन सुरु केलंय.
अंजनगावातील वाद मिटावा, यासाठी आमदार अभिजित पाटील आणि माजी आमदार राजन पाटील यांच्यात तब्बल दीड तास चर्चा झाली. या चर्चेनंतर आमदार अभिजित पाटील हे अंजनगावामध्ये दाखल झाले आहेत. ते गावात येताच लोकांनी मोठी गर्दी केली होती. पोलिसांचा चोख बंदोबस्त गावात आहे.
लक्ष्मण हाके आणि त्यांच्या समर्थकांकडून गावामध्ये ठिय्या आंदोलन सुरु आहे. आमदार पाटील हे आंदोलकांशी चर्चा करीत आहेत. विशेष म्हणजे राजन पाटलांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीमध्ये दोन्ही बाजू्च्या लोकांना बोलावण्यात आलेलं होतं. त्यामुळे आता या वादावर तोडगा निघतो की नाही, हे पाहाणं महत्त्वाचं आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड