
छत्रपती संभाजीनगर, 03 एप्रिल (हिं.स.)।
जिल्ह्यातील प्रशासनात मोठे फेरबदल करण्यात आले असून अनेक महत्त्वाच्या पदांवर नवीन नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या जागी आता विनय गौडा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर महानगरपालिका आयुक्त जी. श्रीकांत यांची जलजीवन मिशनच्या संचालक पदावर बदली झाली असून, त्यांच्या जागी अमोल येडगे हे नवीन मनपा आयुक्त म्हणून कार्यभार स्वीकारणार आहेत.
याचबरोबर, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित प्रभू यांची नागपूर येथे अतिरिक्त आयुक्त पदी नियुक्ती झाली असून, त्यांच्या जागी मिन्नू पी.एम. या नवीन सीईओ म्हणून काम पाहणार आहेत. या बदलांमुळे जिल्हा प्रशासनाच्या कामकाजाला नवी दिशा आणि गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis