
बीड, 03 एप्रिल (हिं.स.)।परळी शहरातील मुख्य रस्ते मोकळेकरणे आणि वाहतूक कोंडीतून नागरिकांची सुटका करण्यासाठी येत्या ६ एप्रिल पासून व्यापक अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात येणार आहे. या संदर्भात नगरपरिषद प्रशासनाने अधिकृत नोटीस जारी केली असून, अतिक्रमणधारकांना एप्रिलपर्यतची मुदत दिली आहे.
गेल्या काही दिवसांपासून परळीतील मुख्य बाजारपेठ, रेल्वे स्टेशन रस्ता आणि वर्दळीच्या चौकांमध्ये वाढत्या अतिक्रमणामुळे पादचाऱ्यांना चालणे मुश्कील झाले आहे. पदपथावर थाटलेली दुकाने व ज्या नागरिकांनी सार्वजनिक जागा, रस्ते किंवा पदपथावर अतिक्रमण केले आहे, त्यांनी ते ५ एप्रिलपर्यंत स्वखुशीने काढून टाकावे. ६ एप्रिलपासून सुरू होणाऱ्या मोहिमेत जे अतिक्रमण काढले जाईल, त्याचा खर्चही अतिक्रमणधारकाकडून वसूल केला जाऊ शकतो. ही मोहीम कोणत्याही दबावाला बळी न पडता कडकपणे राबविली जाणार असल्याचे संकेत प्रशासनाने दिले आहेत.एप्रिलपर्यंत स्वतःहून अतिक्रमणे हटवा; अन्यथा प्रशासकीय बळाचा वापर करून होणार कारवाईकच्च्या-रस्त्यावरील पक्क्या बांधकामांमुळे रुग्णवाहिकांनाही अडथळा निर्माण होत होता. कारवाईकडे लक्ष लागले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis