जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. यांनी सोलापूर जिल्हाधिकारी पदाचा स्वीकारला कार्यभार
सोलापूर, 03 एप्रिल (हिं.स.)। सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याकडून नवीन जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात पदभार स्वीकारला. यावेळी अपर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी, निवासी उपजिल्हाधिकारी अभिजीत पाटील, प्रांत अधिकार
sdfg


सोलापूर, 03 एप्रिल (हिं.स.)। सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याकडून नवीन जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात पदभार स्वीकारला. यावेळी अपर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी, निवासी उपजिल्हाधिकारी अभिजीत पाटील, प्रांत अधिकारी सुमित शिंदे, तहसीलदार निलेश पाटील, पंढरपूरचे तहसिलदार सचिन लंगुटे यांच्यासह महसूल विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

राज्य शासनाच्या 2 एप्रिल 2026 रोजीच्या आदेशानुसार जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची बदली नागपूरचे जिल्हाधिकारी म्हणून करण्यात आली तर सोलापूरचे जिल्हाधिकारी म्हणून कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. यांची नियुक्ती झाली आहे. तरुण, अभ्यासू आणि प्रशासनातील तांत्रिक समज असलेले अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande