नाशकात जमीन व गौण खनिज वसुलीत उल्लेखनीय वाढ; एकूण महसूल ₹337.14 कोटींवर
गौण खनिज विभागाचा 55% वाटा; जमीन महसूलातही सातत्यपूर्ण वाढ नाशिक, 03 एप्रिल (हिं.स.)। जिल्ह्यातील जमीन व गौण खनिज वसुलीच्या कामगिरीत चालू आर्थिक वर्षात लक्षणीय वाढ नोंदविण्यात आली आहे. वार्षिक महसूल वाढ अहवालानुसार, एकूण वसुलीमध्ये ₹20.52 कोटींची
नाशकात जमीन व गौण खनिज वसुलीत उल्लेखनीय वाढ; एकूण महसूल ₹337.14 कोटींवर


गौण खनिज विभागाचा 55% वाटा; जमीन महसूलातही सातत्यपूर्ण वाढ

नाशिक, 03 एप्रिल (हिं.स.)।

जिल्ह्यातील जमीन व गौण खनिज वसुलीच्या कामगिरीत चालू आर्थिक वर्षात लक्षणीय वाढ नोंदविण्यात आली आहे. वार्षिक महसूल वाढ अहवालानुसार, एकूण वसुलीमध्ये ₹20.52 कोटींची (6.48%) वाढ होऊन महसूल ₹337.14 कोटींवर पोहोचला आहे. मागील वर्षी ही वसुली ₹316.62 कोटी इतकी होती.जमीन महसूल (0029) अंतर्गत चालू वर्षात ₹151.19 कोटींची वसुली झाली असून, मागील वर्षाच्या ₹145.67 कोटींच्या तुलनेत ₹5.52 कोटींची (3.79%) वाढ झाली आहे. यामुळे जमीन महसूलात स्थिर आणि सकारात्मक वाढ कायम असल्याचे दिसून येते.

तर खनिज महसूल (0853) विभागात अधिक ठळक वाढ नोंदवली गेली आहे. चालू वर्षात ₹185.96 कोटींची वसुली झाली असून, मागील वर्षीच्या ₹170.95 कोटींच्या तुलनेत ₹15.01 कोटींची (8.78%) वाढ झाली आहे. यामुळे गौण खनिज विभाग हा महसूल वाढीचा प्रमुख घटक ठरला आहे.

चालू वर्षातील एकूण महसूलात खनिज विभागाचा वाटा 55.15 टक्के असून, जमीन महसूलाचा वाटा 44.85 टक्के आहे. या आकडेवारीवरून जिल्ह्यातील महसूल वाढीत खनिज वसुलीचा मोठा वाटा असल्याचे स्पष्ट होते.

सदर वाढ ही प्रभावी नियोजन, काटेकोर अंमलबजावणी आणि महसूल वसुलीसाठी राबविण्यात आलेल्या उपाययोजनांचे फलित असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. आगामी काळातही महसूल वाढीचा हा कल कायम ठेवण्यासाठी अधिक प्रभावी पावले उचलली जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande