
सोलापूर, 03 एप्रिल (हिं.स.)। सोलापूर शहर भारतीय जनता पक्षाची संघटनात्मक बैठक राज्याचे प्रमुख तथा माजी खासदार श्री. किरीटजी सोमय्या यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात पार पडली.
या बैठकीस आमदार देवेंद्र दादा कोठे, महापौर श्री विनायक कोंड्याल, शहराध्यक्ष रोहिणी ताई तळवळकर, सभागृह नेते नरेंद्र काळे, स्थायी समिती सभापती रंजिताताई चाकोते, ज्येष्ठ नेते रामचंद्र काका जन्नु, सरचिटणीस सुधाताई अल्लीमोरे, नारायण बनसोडे, डॉ. शिवराज सरतापे तसेच सर्व भाजपा नगरसेवक, मंडळ अध्यक्ष व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.बैठकीदरम्यान पक्ष संघटना अधिक बळकट करण्यावर भर देण्यात आला. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रभावी नियोजन, बूथ स्तरावर कामकाज मजबूत करणे, तसेच विविध संघटनात्मक विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली. यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना श्री. किरीटजी सोमय्या यांनी संघटनशक्ती वाढवण्याचे आणि जनसंपर्क अधिक दृढ करण्याचे आवाहन केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड