विठ्ठल-रुक्मिणी मातेचे दर्शन घेऊन एस. कार्तिकेयन यांनी स्वीकारला पदभार
सोलापूर, 03 एप्रिल, (हिं.स.)। श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेचे दर्शन घेऊन सोलापूरचे नवनियुक्त जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी पदभार स्वीकारला. नागपूरचे नवे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याकडून कार्तिकेयन यांनी जिल्हा प्रशासनाची सूत्रे स्वीकारली.
dsfgdsf


सोलापूर, 03 एप्रिल, (हिं.स.)। श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेचे दर्शन घेऊन सोलापूरचे नवनियुक्त जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी पदभार स्वीकारला. नागपूरचे नवे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याकडून कार्तिकेयन यांनी जिल्हा प्रशासनाची सूत्रे स्वीकारली. मावळते जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी नवे जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

कुमार आशीर्वाद यांची नागपूरचे जिल्हाधिकारी म्हणून बदली झाली. त्यानंतर आशीर्वाद यांच्या जागी सोलापूरचे जिल्हाधिकारी म्हणून कोल्हापूर जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. कार्तिकेयन यांची नियुक्ती गुरुवारी सायंकाळी करण्यात आली आहे. राज्याचे सहसचिव सुभाष उमारणीकर यांनी बदलीचे आदेश पारित केले आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande