भरधाव कारची रिक्षाला जोरदार धडक; चालक गंभीर जखमी
रायगड, 03 एप्रिल (हिं.स.) : वडखळ पोलीस ठाणे हद्दीत वाशी-काळेश्री मार्गावर गुरुवारी पहाटे भीषण अपघात घडला. भरधाव वेगात येणाऱ्या कारने रिक्षाला जोरदार धडक दिल्याने रिक्षाचालक गंभीर जखमी झाला असून प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माह
pen


रायगड, 03 एप्रिल (हिं.स.) : वडखळ पोलीस ठाणे हद्दीत वाशी-काळेश्री मार्गावर गुरुवारी पहाटे भीषण अपघात घडला. भरधाव वेगात येणाऱ्या कारने रिक्षाला जोरदार धडक दिल्याने रिक्षाचालक गंभीर जखमी झाला असून प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पहाटे सुमारे 5.30 वाजण्याच्या सुमारास मौजे वाशी गावाच्या हद्दीत, वाशी-काळेश्री रोडवर वनस्पती देवी मंदिराजवळ हा अपघात झाला. ऑटो रिक्षा (क्रमांक एमएच-०४/एचझेड/२२७९) वाशीहून काळेश्रीकडे जात असताना समोरून येणारी टाटा कंपनीची कार (एमएच-०३/एफडी/१३४०) भरधाव वेगात आणि बेदरकारपणे चालवली जात होती.

कारचालकाने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून समोरून येणाऱ्या रिक्षाला जोरदार धडक दिली. या अपघातात रिक्षाचालक प्रितम गजानन म्हात्रे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. तसेच रिक्षातील प्रवासी व साक्षीदार आर्या पाटील यांच्या डोक्याला आणि छातीला किरकोळ दुखापत झाली आहे. अपघातात रिक्षाचे मोठे नुकसान झाले आहे.

या प्रकरणी कारचालकाविरोधात वडखळ पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३०/२०२६ दाखल करण्यात आला आहे. भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम २८१, १२५ (अ), १२५ (ब) तसेच मोटार वाहन कायद्याच्या कलम १८४ नुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

--------------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande