जळगावमध्ये वाळूच्या डंपरने घेतला बी. फार्मसी विद्यार्थिनीचा जीव; दुसरी गंभीर जखमी
जळगाव, 03 एप्रिल (हिं.स.) | जिल्ह्यात नियम धाब्यावर बसवून भरधाव वेगाने धावणाऱ्या डंपरमुळे रस्ते अपघातांचे प्रमाण वाढले असून अनेक निरपराध नागरिकांना आपल्या जीवाला मुकावे लागले आहे. अशातच चाळीसगाव शहरालगतच्या धुळे–सोलापूर महामार्गावर भरधाव वाळू डंपर
बी. फार्मसी विद्यार्थिनीचा जीव


जळगाव, 03 एप्रिल (हिं.स.) | जिल्ह्यात नियम धाब्यावर बसवून भरधाव वेगाने धावणाऱ्या डंपरमुळे रस्ते अपघातांचे प्रमाण वाढले असून अनेक निरपराध नागरिकांना आपल्या जीवाला मुकावे लागले आहे. अशातच चाळीसगाव शहरालगतच्या धुळे–सोलापूर महामार्गावर भरधाव वाळू डंपरने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात बी. फार्मसीचे शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थिनीचा जागीच मृत्यू झाला, तर दुसरी गंभीर जखमी झाली ही दुर्घटना दसेगाव फाट्याजवळ घडली असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

मृत विद्यार्थिनीचे नाव चंचल नामदेव लांडगे (वय २०, रा. रहिपुरी) असे असून वैष्णवी चौधरी ही गंभीर जखमी झाली आहे. दोघीही चाळीसगाव येथील एका महाविद्यालयात बी. फार्मसीचे शिक्षण घेत होत्या आणि दुचाकीने रहिपुरीकडे जात असताना मागून आलेल्या डंपरने त्यांना जोरदार धडक दिली. अपघातात दोघी रस्त्यावर फेकल्या गेल्या, त्यात चंचलचा मृत्यू झाला. दरम्यान, अवैध वाळू वाहतुकीविरोधात संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी महामार्गावर ठिय्या आंदोलन करत सुमारे अर्धा तास वाहतूक रोखून धरली. डंपरचालकावर कठोर कारवाईची मागणी करत आंदोलन करण्यात आले. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी घटनास्थळावरून चालकाला ताब्यात घेत डंपर जप्त केला असून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande