नाशिकमध्ये घरात घुसून महिलेचा विनयभंग
Woman molested by husband's friend after entering house
नाशिकमध्ये घरात घुसून महिलेचा विनयभंग


नाशिक, 03 एप्रिल (हिं.स.) महिला घरात एकटी असल्याची संधी साधून घरी आलेल्या पतीच्या मित्राने स्त्रीमनास लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य करुन विनयभंग केल्याची घटना सिडको परिसरात घडली.

फिर्यादी महिला ही विजयनगर परिसरात रहाते. काल गुरुवारी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास ही महिला घरात एकटीच होती. त्यावेळी पतीचा मित्र आरोपी सोनू आहिरे (रा. नाशिक) हा घरामध्ये बळजबरीने घुसला. पिडीतेने त्याला पती घरी नाही, असे सांगितले. मात्र त्याने पिडीतेचे काहीही न ऐकता घराबाहेर न जाता स्त्रीमनास लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन करीत तिला खाली पाडून तिचा विनयभंग केला. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात सोनू आहिरेविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस अंमलदार गावडे करीत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande