अंजनेरी गड येथे जपानुष्ठान सोहळ्याची सांगता; श्री हनुमान जन्मोत्सव उत्साहात
जगदगुरु स्वामी शांतिगिरीजी महाराज यांची उपस्थिती ओझर / त्रंबकेश्वर, 03 एप्रिल (हिं.स.)। निष्काम कर्मयोगी शिवयोगी जगदगुरु जनार्दन स्वामी (मौनगिरीजी) महाराज धर्मपीठाचे पिठाधीश्वर अनंत विभूषित जगदगुरु स्वामी शांतिगिरीजी महाराज यांच्या प्रेरणेने व
The Japanushthan ceremony


जगदगुरु स्वामी शांतिगिरीजी महाराज यांची उपस्थिती

ओझर / त्रंबकेश्वर, 03 एप्रिल (हिं.स.)।

निष्काम कर्मयोगी शिवयोगी जगदगुरु जनार्दन स्वामी (मौनगिरीजी) महाराज धर्मपीठाचे पिठाधीश्वर अनंत विभूषित जगदगुरु स्वामी शांतिगिरीजी महाराज यांच्या प्रेरणेने व प्रमुख उपस्थित श्रीक्षेत्र अंजनेरी गड येथे हनुमान जन्मोत्सव निमित्त गेल्या आठवड्याभरापासून आयोजित जपानुष्ठान सोहळ्याची सांगता व हनुमान जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. श्री हनुमंतरायाचे जन्मस्थान असलेल्या अंजनेरी गडाचा सर्वांगीण विकास व्हावा,तेथे भव्य मंदिर उभारावे यासाठी निष्काम कर्मयोगी जगदगुरू जनार्दन स्वामी महाराज यांचे उत्तराधिकारी अनंत विभूषित जगदगुरु स्वामी शांतीगिरीजी महाराज गेल्या पंचवीस वर्षांपासून अंजनेरी गड येथे अखंडितपणे प्रतिवर्षी आठवडाभर धर्म सोहळ्याचे आयोजन करत आहे.या सोहळ्या दरम्यान जपानुष्ठान, महायज्ञ,अखंड नंदादीप, हस्तलिखित नामजप, ध्यान, प्राणायाम,श्रमदान यांसह भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. याही वर्षी विविध कार्यक्रम व श्रमदान संपन्न झाले.श्री हनुमान जन्मोत्सवाच्या पवित्र दिवशी पहाटे ब्रह्ममुहूर्तावर जगदगुरु स्वामी शांतिगिरीजी महाराज यांच्या हस्ते अंजनेरी पर्वतावरील हनुमान जन्मस्थानाच्या मूळ स्थानी विधिवत पूजन करण्यात आले.यावेळीं जगदगुरु बाबाजींसह असंख्य भाविकांनी पहाटे तीन वाजता गड चढत या मंगलमय सोहळ्यात सहभाग नोंदवला. संपूर्ण परिसर जय बाबाजी व जय श्रीराम..जय हनुमान..अशा गजराने आणि भक्तिमय वातावरणाने दुमदुमून गेला होता.यावेळी पालखी पूजन,संत,अतिथी,ब्राम्हण व काही विशेष भाविकांचे पूजन करण्यात आले.हनुमान स्वरूप लहान बालकाचे पूजनही यावेळी संपन्न झाले.जगदगुरु स्वामी शांतिगिरीजी महाराज यांनी उपस्थित भाविकांना महत्वपूर्ण मार्गदर्शन केले. उत्साहपूर्ण आणि भक्तिपूर्ण वातावरणात जपानुष्ठान सोहळ्याची सांगता करण्यात आली.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande