‘स्वराज्य भूमी रायगड गौरव संमेलन २०२६’ उत्साहात
रायगड, 03 एप्रिल (हिं.स.) : महाड तालुक्यातील नडगाव तर्फे बीरवाडी येथे आयोजित “स्वराज्य भूमी रायगड गौरव संमेलन २०२६” मोठ्या उत्साहात आणि दिमाखात पार पडले. आई फाउंडेशन, रायगड आणि महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, रायगड जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमाने या
ournalist Abhijit Darekar is honored


रायगड, 03 एप्रिल (हिं.स.) : महाड तालुक्यातील नडगाव तर्फे बीरवाडी येथे आयोजित “स्वराज्य भूमी रायगड गौरव संमेलन २०२६” मोठ्या उत्साहात आणि दिमाखात पार पडले. आई फाउंडेशन, रायगड आणि महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, रायगड जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमाने या संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते.

या संमेलनात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. कर्जत येथील पत्रकार अभिजित नारायण दरेकर यांना ‘द ग्रेट पत्रकारिता आयकॉन अवॉर्ड २०२६’ प्रदान करून गौरविण्यात आले. ग्रामीण भागातील प्रश्न, सामाजिक विषय आणि जनतेच्या अडचणींवर प्रामाणिक व धाडसी पत्रकारिता केल्याबद्दल त्यांची निवड करण्यात आली.

या सोहळ्यात अभिनेते अजय तपकिरे यांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात आले. संमेलनाध्यक्ष डॉ. विनोदराव मोरे यांनी मार्गदर्शन करताना समाजातील विविध घटकांनी एकत्र येऊन सकारात्मक बदल घडवून आणण्याचे महत्त्व अधोरेखित केले.

कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना अभिवादन करून करण्यात आली. त्यानंतर विविध मान्यवरांच्या उपस्थितीत सन्मान सोहळा पार पडला. कार्यक्रमाला पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, स्थानिक नागरिक आणि विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

---------------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande