जुळे सोलापूरात पाणी समस्येवर सभागृह नेते नरेंद्र काळे यांची तात्काळ दखल
सोलापूर, 04 एप्रिल (हिं.स.)। जुळे सोलापूर येथील आर्य चाणक्य नगर परिसरातील नागरिकांच्या पाणीपुरवठ्याबाबत आलेल्या तक्रारीची सभागृह नेते नरेंद्र काळे यांनी तात्काळ दखल घेत प्रत्यक्ष त्या भागाला भेट दिली. यावेळी त्यांनी स्थानिक रहिवाशांशी संवाद साधत प
Kdnd


सोलापूर, 04 एप्रिल (हिं.स.)। जुळे सोलापूर येथील आर्य चाणक्य नगर परिसरातील नागरिकांच्या पाणीपुरवठ्याबाबत आलेल्या तक्रारीची सभागृह नेते नरेंद्र काळे यांनी तात्काळ दखल घेत प्रत्यक्ष त्या भागाला भेट दिली.

यावेळी त्यांनी स्थानिक रहिवाशांशी संवाद साधत पाणीपुरवठ्याशी संबंधित अडचणी जाणून घेतल्या. नागरिकांनी अनियमित पाणीपुरवठा, कमी दाबाने येणारे पाणी तसेच वेळेवर पाणी न मिळण्याच्या समस्या मांडल्या.

या समस्यांचे लवकरात लवकर निवारण करण्यासाठी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून, हा प्रश्न तातडीने मार्गी लावण्याच्या सूचना नरेंद्र काळे यांनी दिल्या.

प्रशासनाने त्वरित दखल घेतल्याने परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले. यावेळी स्थानिक नागरिकांसह सोलापूर महानगरपालिकेचे अधिकारी उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande