
रत्नागिरी, 5 एप्रिल, (हिं. स.) : चैत्री संकष्टीनिमित्ताने गणपतीपुळे येथील मंदिरातील स्वयंभू गणपती मूर्तीला आंब्यांची सजावट करण्यात आली.
गणपतीपुळ्यात दर महिन्याच्या संकष्टीला विविध प्रकारची सजावट केली जाते. त्या त्या काळात उपलब्ध असणारी फळे, तर कधी फुलांच्या सजावटीचा त्यात समावेश असतो. आंबा हंगामाच्या सुरुवातीच्या काळात आंब्याच्या मोहराची सजावट केली जाते. आजच्या संकष्टीच्या दरम्यान हापूस आंब्याचा हंगाम सुरू आहे. त्यामुळे आंब्याची सजावट करण्यात आली आहे. दर्शनाचा लाभ घेणाऱ्या भाविकांनी ही सजावट पाहून समाधान व्यक्त केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी