धारणी हादरलं; सिपना नदीत बुडून दोन सख्ख्या बहिणींचा दुर्दैवी मृत्यू
अमरावती, 05 एप्रिल, (हिं.स.)। धारणी तालुक्यातील दिया गावाजवळ रविवारी सकाळी सिपना नदीत घडलेल्या दुर्दैवी घटनेत दोन सख्ख्या बहिणींचा बुडून मृत्यू झाला. सकाळी सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मिळालेल्या माह
धारणी हादरलं! सिपना नदीत बुडून दोन सख्ख्या बहिणींचा दुर्दैवी मृत्यू


अमरावती, 05 एप्रिल, (हिं.स.)। धारणी तालुक्यातील दिया गावाजवळ रविवारी सकाळी सिपना नदीत घडलेल्या दुर्दैवी घटनेत दोन सख्ख्या बहिणींचा बुडून मृत्यू झाला. सकाळी सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आनंद गिरी यांच्या आस्था (१२) आणि अनु (१४) या दोन्ही बहिणी इतर मुलांसोबत नदीवर आंघोळीसाठी गेल्या होत्या. आंघोळ करत असताना आस्था अचानक खोल पाण्यात जाऊन बुडू लागली. बहिणीला वाचवण्यासाठी अनुने तात्काळ नदीत उडी घेतली; मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने दोघींचाही बुडून दुर्दैवी मृत्यू झाला.घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत पोलिसांना कळवले. स्थानिकांच्या मदतीने दोघींचे मृतदेह बाहेर काढून धारणी उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले. या घटनेमुळे गावात शोककळा पसरली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande