आरटीई प्रवेशांसाठी सोमवारी सोडत
पुणे, 04 एप्रिल (हिं.स.)। शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत (आरटीई) खासगी शाळांतील २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेशासाठी सहा एप्रिल रोजी सोडत काढण्यात येणार आहे. सोडतीमध्ये प्रवेश जाहीर होणाऱ्या विद्यार्थ्यांची यादी, प्रतीक्षा यादी तयार करण्यात येणार असून
rte


पुणे, 04 एप्रिल (हिं.स.)।

शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत (आरटीई) खासगी शाळांतील २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेशासाठी सहा एप्रिल रोजी सोडत काढण्यात येणार आहे. सोडतीमध्ये प्रवेश जाहीर होणाऱ्या विद्यार्थ्यांची यादी, प्रतीक्षा यादी तयार करण्यात येणार असून, सोडतीनंतर शाळांतील प्रत्यक्ष प्रवेश सुरू केले जाणार आहेत.

प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे याबाबतची माहिती दिली. ‘आरटीई’ २५ टक्के प्रवेशासाठी विद्यार्थ्याच्या निवासस्थानापासून १ किलोमीटरच्या अंतरातील शाळा निवडण्याची शिक्षण विभागाने घातलेली अट उच्च न्यायालयाने रद्द केली. त्यानंतर प्राथमिक शिक्षण संचालनालयाने आधी अर्ज भरलेल्या पालकांना पुन्हा अर्ज भरण्यासाठी, तसेच अर्ज न भरलेल्या पालकांना अर्ज भरण्याची संधी दिली.

यंदा आरटीई प्रवेशांसाठी राज्यातील ८ हजार ७०१ शाळांमध्ये १ लाख १४ हजार ८२६ जागा उपलब्ध आहेत. अर्ज भरण्यासाठी ३१ मार्चपर्यंत दिलेल्या मुदतीमध्ये २ लाख ८९ हजार ४९८ अर्ज दाखल झाले. गेल्या वर्षी ३ लाख ५ हजार १५१ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा आरटीईच्या अर्जांमध्ये घट झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande