भाजपा स्थापना दिनानिमित्त रत्नागिरीत विविध कार्यक्रमांचे आयोजन
रत्नागिरी, 5 एप्रिल, (हिं. स.) : भारतीय जनता पार्टी स्थापना दिवसानिमित्त भाजप रत्नागिरी शहर मंडलाच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. संपूर्ण जिल्हा कार्यालयावर विद्युत रोषणाई केली जाणार आहे. जिल्हा कार्यालयात ६ एप्रिल रोजी सत्यना
भाजपा स्थापना दिनानिमित्त रत्नागिरीत विविध कार्यक्रमांचे आयोजन


रत्नागिरी, 5 एप्रिल, (हिं. स.) : भारतीय जनता पार्टी स्थापना दिवसानिमित्त भाजप रत्नागिरी शहर मंडलाच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. संपूर्ण जिल्हा कार्यालयावर विद्युत रोषणाई केली जाणार आहे.

जिल्हा कार्यालयात ६ एप्रिल रोजी सत्यनारायणाची पूजा-महाप्रसाद, सकाळी १० वाजता पक्षाचा ध्वजवंदन आणि मिठाईवाटप होणार आहे. सकाळी ११ वाजता भारतीय जनता पार्टीचा इतिहास व विकासकामे तसेच राज्य व केंद्र शासनाच्या विविध योजना या विषयावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे. या चर्चासत्रास बाबासाहेब परुळेकर, शिल्पाताई पटवर्धन आणि डॉ.ऋषिकेश केळकर सहभागी होणार आहेत. सायंकाळी ४ वाजता भजन होईल.

येत्या ६ ते १० एप्रिल या काळात प्रत्येक कार्यकर्त्याच्या घरावर भाजपा ध्वज फडकविला जाणार असून ९ एप्रिल रोजी सक्रिय कार्यकर्ता संमेलन व चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे. तसेच ७ एप्रिल ते १२ एप्रिल दरम्यान सर्व प्रभागांमध्ये संपर्क अभियान राबवले जाणार असून ६ ते १२ एप्रिल याच दरम्यान लाभार्थी संपर्क संवाद आयोजित करण्यात आला आहे.

नाचणे रोड मंगळवार आठवडा बाजारात ८ एप्रिल रोजी स्वच्छता मोहीम व १२ एप्रिल रोजी शनिवार आठवडा बाजारात स्वच्छता मोहीम राबवली जाणार आहे.

हे सर्व कार्यक्रम जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव, महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष वर्षाताई ढेकणे, कार्यक्रमाचे जिल्हा संयोजक राजू भाटलेकर यांच्या मार्गदर्शनाखाली व शहराध्यक्ष दादा ढेकणे यांच्या नेतृत्वात केले जाणार असून या सर्व कार्यक्रमांची जबाबदारी नीलेश आखाडे, सचिन गांधी, संदीप सुर्वे, सायली बेर्डे, मानसी करमरकर, नितीन जाधव, राजेंद्र फाळके, विक्रम जैन, प्रीती शिंदे, प्रशांत घाणेकर, डॉ ऋषिकेश केळकर, दादा ढेकणे, भक्ती दळी, शेखर लेले, शैलेश बेर्डे, राजेश तोडणकर, वर्षाताई ढेकणे, संतोष सावंत, समीर तिवरेकर, प्रज्ञा टाकळे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यावर सोपवण्यात आली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande