सोलापूर - शिवा संघटनेकडून महापौरांचा सत्कार
सोलापूर, 04 एप्रिल (हिं.स.)। शिवा अखिल भारतीय वीरशैव युवक संघटना, बेडा बुडगा जगंम समाज व प्रहार संघटना यांच्या वतीने लिंगायत समाजासाठी स्मशानभूमीची जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल तसेच श्री महात्मा बसवेश्वर पुतळ्यासाठी ५० लाख व लिंगायत भवन साठी २५ रुप
dfgdf


सोलापूर, 04 एप्रिल (हिं.स.)। शिवा अखिल भारतीय वीरशैव युवक संघटना, बेडा बुडगा जगंम समाज व प्रहार संघटना यांच्या वतीने लिंगायत समाजासाठी स्मशानभूमीची जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल तसेच श्री महात्मा बसवेश्वर पुतळ्यासाठी ५० लाख व लिंगायत भवन साठी २५ रुपयांचा निधी मंजूर केल्याबद्दल आज सातलिंग स्वामी यांच्या निवासस्थानी महापौर विनायक कोंड्याल यांचा सत्कार शिवा संघटना महाराष्ट्रचे सरचिटणीस व राज्याचे माजी मंत्री बच्चू भाऊ कडू यांचे स्वीय सहाय्याक सातलिंग स्वामी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच शहराध्यक्ष श्रीमती रोहिणी तडवळकर यांचा सत्कार कांचनाताई स्वामी यांनी केला, सभागृह नेते नरेंद्र काळे यांचा सत्कार शिवा संघटना जिल्हाध्यक्ष राजकुमार सारणे यांनी केला. नगरसेविका वनिता पाटील व अश्विनी चव्हाण यांचा सत्कार कांचनाताई स्वामी व महिला मंडळाच्या वतीने करण्यात आला.

याशिवाय माजी नगरसेवक गुरुशांत धुत्तरगावंकर यांचा सत्कार बेडा बुडगा जगम समाजाचे महाराष्ट्र अध्यक्ष राजशेखर कंदलगावकर यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच यावेळी प्रहार संघटनेच्या वतीने अध्यक्ष अजित कुलकर्णी व सर्व पदाधिकाऱ्यांनी महापौर श्री विनायक कोंड्याल यांचा विशेष सत्कार केला.कार्यक्रमास बसवेश्वर स्मारक समितीचे बसवराज बगले,दक्षिण सोलापुर जंगम समाज अध्यक्ष शिवानंद महादेव स्वामी,शिवा संघटनेचे चे शहर अध्यक्ष परमेश्वर माळगे, केदार स्वामी महेश सुतार, प्रहार संघटनेचे खालिद माणियार, सिद्रामय्या हिरेमठ,नागेश धाबे व पंचाक्षरी स्वामी यानी सुञसंचालन केले. उपस्थितांनी या निर्णयाबद्दल महापौरांचे आभार मानत लिंगायत समाजासाठी हे ऐतिहासिक व महत्त्वपूर्ण पाऊल असल्याचे मत व्यक्त केले.

महापौर विनायक कोंड्याल यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, “महात्मा बसवेश्वरांनी दिलेली समता, सेवा आणि समाजहिताची शिकवण आपल्या कार्याचा आधार आहे. लिंगायत समाजासाठी स्मशानभूमीची सोय करणे ही केवळ एक प्रशासकीय जबाबदारी नसून समाजाच्या भावनांचा सन्मान आहे. ५० लाख रुपयांचा निधी मंजूर करून बसवेश्वरांचा भव्य पुतळा परिसर सुशोभीकरण व लिंगायत भवन साठी २५ लाख निधीतून करण्यात येणार असून तो येणाऱ्या पिढ्यांसाठी प्रेरणास्थान ठरेल. महानगरपालिका सर्व समाजघटकांच्या विकासासाठी सदैव तत्पर असून अशा लोकाभिमुख निर्णयांद्वारे सर्वांना न्याय देण्याचा आमचा प्रयत्न राहील.”सदर कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande