
लातूर, 05 एप्रिल (हिं.स.)। लातूर जिल्ह्याच्या मावळत्या जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांना निरोप देताना भावनिक वातावरण पाहायला मिळाले. त्यांच्या निरोप समारंभावेळी अनेक अधिकारी, कर्मचारी आणि महिला पोलिसांना अश्रू अनावर झाले. मुंबई येथे बदली झाल्यानंतर त्यांना निरोप देण्यात आला असून, डॉ भारत बास्तेवाड यांनी लातूरचे नवे जिल्हाधिकारी म्हणून पदभार स्वीकारला.
या प्रसंगी वर्षा ठाकूर-घुगे यांनी नूतन जिल्हाधिकाऱ्यांचे स्वागत करत पदभार सुपूर्द केला. अनेक महिला अधिकारी यांनी त्यांची गळाभेट घेत भावनिक निरोप दिला. स्वतः वर्षा ठाकूर-घुगे यांनाही आपले अश्रू आवरता आले नाहीत. गेल्या दोन वर्षांपासून त्या लातूर जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत होत्या. त्यांच्या कार्यकाळात प्रशासनात अनेक सकारात्मक बदल घडले. आता डॉ. बास्टेवाड यांच्या नेतृत्वाखाली प्रशासन अधिक सक्षम आणि गतिमान होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis