चंद्रपूर : वाघाच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा जागीच मृत्यू
चंद्रपूर, 05 एप्रिल (हिं.स.)। चंद्रपूर जिल्ह्यात मानव-वन्यजीव संघर्ष कायमच आहे. नागभीड तालुक्यातील मिंथुर येथील शेतालगत एका नाल्याजवळ वाघाच्या हल्ल्यात एका शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना रविवारी सकाळी समोर आली. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वात
चंद्रपूर : वाघाच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा जागीच मृत्यू


चंद्रपूर, 05 एप्रिल (हिं.स.)। चंद्रपूर जिल्ह्यात मानव-वन्यजीव संघर्ष कायमच आहे. नागभीड तालुक्यातील मिंथुर येथील शेतालगत एका नाल्याजवळ वाघाच्या हल्ल्यात एका शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना रविवारी सकाळी समोर आली. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान मानव वन्य जीव संघर्ष जिल्ह्यात कायम असून मागील सुमारे सव्वा तीन महिन्यात बारा जणांचा मृत्यू वन्यजीव हल्ल्यात झाल्याची माहिती समोर आली आहे.

मिंथुर येथील रहिवासी ५८ वर्षीय हरिदास महादेव कुबडे हे शनिवारी सकाळी मोहफुले वेचण्यासाठी आपल्या शेताकडे गेले होते. मात्र, दिवस मावळला तरी ते घरी परतले नाहीत. चिंतेत पडलेल्या कुटुंबीयांनी आणि ग्रामस्थांनी परिसरात त्यांचा शोध सुरू केला. रात्रीचा काळोख आणि हिंस्त्र श्वापदाची भीती यामुळे शोध मोहिमेत अडथळे आले. रविवारी सकाळी वनविभागाच्या पथकाने आणि ग्रामस्थांनी पुन्हा शोध मोहीम राबवली असता, शेताजवळील एका नाल्यालगत हरिदास कुबडे यांच्या शरीराचे छिन्नविछिन्न अवशेष आढळून आले. वाघाने त्यांच्यावर हल्ला करून त्यांना ओढत नेल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. या घटनेनंतर मिंथुर आणि आजूबाजूच्या गावांमध्ये दहशतीचे वातावरण आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / एम.पंकजराव


 rajesh pande