
रत्नागिरी, 5 एप्रिल, (हिं. स.) : रत्नागिरीच्या माजी आमदार कुसुमताई अभ्यंकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त भारतीय जनता पार्टी जिल्हा कार्यालयात त्यांना भावपूर्ण अभिवादन करण्यात आले. यावेळी त्यांच्या कार्यकाळातील अनेक पदाधिकारी व महिला उपस्थित होत्या.
शेखर लेले यांनी कुसुमताई अभ्यंकर यांच्या कार्याची आठवण करून देत त्यांच्या नेतृत्वगुणांचा आणि समाजकार्यातील योगदानाचा गौरव केला. महिला सक्षमीकरणासाठी त्यांनी केलेल्या कार्याचा उल्लेख करत त्यांचे अनुभव कथन केले.
सुनीता पाटणकर यांनी कुसुमताईंच्या सहवासातील आठवणी सांगत त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील साधेपणा, कार्यतत्परता आणि जनसामान्यांशी असलेला जिव्हाळा यावर प्रकाश टाकला.
महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष सौ. वर्षा ढेकणे, शहराध्यक्ष दादा ढेकणे, पदवीधर सेलचे मनोज पाटणकर, माजी शहराध्यक्ष राजन फाळके, शेखर लेले, महिला शहराध्यक्ष भक्ती दळी, जिल्हा उपाध्यक्ष अशोक वाडेकर, इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
उपस्थितांनी कुसुमताई अभ्यंकर यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन समाजसेवेचे कार्य पुढे नेण्याचा निर्धार व्यक्त केला.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी