
पुणे, 06 एप्रिल (हिं.स.)। दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या २८ जानेवारी रोजी झालेल्या विमान अपघाती निधनानंतर रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी राजकीय घडामोडींना वेग आला आहे. महायुतीने सुनेत्रा पवार यांना उमेदवारी दिली असून, बिनविरोध निवडणुकीसाठी प्रयत्न सुरू आहेत. मात्र, काँग्रेसने अॅड. आकाश मोरे यांना उमेदवारी जाहीर केल्याने लढत रंगताना दिसत होती. ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी देखील निवडणूक लढवण्याची आक्रमक भूमिका घेतली होती. त्यामुळे बिनविरोध निवडणुकीची शक्यता मावळली होती. मात्र, ऐन उमेदवारी अर्ज भरण्याच्या मुदतीत फक्त काही तास शिल्लक असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी लक्ष्मण हाकेंची भेट घेतली आणि त्यांना अर्ज मागे घेण्याची विनंती केली.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु