नांदेड : चौदाशे किलो चंदन जप्त, पाच जणांवर गुन्हा दाखल
नांदेड, 06 एप्रिल (हिं.स.)। लातूरहून मध्य प्रदेशातील बुऱ्हाणपूरकडे चंदनाची अवैध वाहतूक होत असल्याची माहिती मिळताच पोलिस उपमहानिरीक्षकांच्या विशेष पथकाने लोहा हद्दीत कारवाई करत तब्बल ५१ लाख ९६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईत १,४७० किलो
नांदेड : चौदाशे किलो चंदन जप्त, पाच जणांवर गुन्हा दाखल


नांदेड, 06 एप्रिल (हिं.स.)। लातूरहून मध्य प्रदेशातील बुऱ्हाणपूरकडे चंदनाची अवैध वाहतूक होत असल्याची माहिती मिळताच पोलिस उपमहानिरीक्षकांच्या विशेष पथकाने लोहा हद्दीत कारवाई करत तब्बल ५१ लाख ९६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईत १,४७० किलो चंदनासह आयशर वाहन आणि रोख रक्कम हस्तगत करण्यात आली असून, पाच जणांविरुद्ध लोहा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

लोहा ते नांदेड रोडवरील सई हॉटेलजवळ पथकाने संशयित आयशर वाहन अडवून तपासणी केली. सुरवातीला वाहन रिकामे असल्याचे भासवण्यात आले होते. मात्र, तपासणीदरम्यान वाहनाच्या बॉडीमध्ये चालकाच्या पाठीमागे गुप्त कप्पा असल्याचे आढळून आले. ताडपत्री उघडून पाहिले असता त्याखाली गोण्यांमध्ये चंदन लपवून ठेवलेल्याचे दिसून आले. जप्त केलेल्या चंदनाचे वजन १,४७० किलो असून, त्याची किंमत ३६ लाख ७५ हजार रुपये आहे. शिवाय आयशर वाहन व ११ हजार रुपयांची रोख रक्कम असा ५१ लाख ९६ हजारांचा मुद्देमाल ताब्यात घेतला. दरम्यान, अवैध व्यवसायांवर आळा घालण्यासाठी 'खबर' हेल्पलाइन सुरू केली असून, नागरिकांनी ९१ ५० १०० १०० या क्रमांकावर माहिती देऊन पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

--------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande