
अमरावती, 06 एप्रिल (हिं.स.)
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्यसेवा मुख्य परीक्षेला रविवार ५ एप्रिलपासून दिमाखात सुरुवात झाली. जिल्ह्यात मुख्य परीक्षेसाठी ९४ उमेदवार पात्र होते. पहिल्यादिवशी दोन सत्रात ही परीक्षा पार पडली. सकाळच्या सत्रात ७१ उमेदवार हजर तर २३ विविध कारणांनी गैरहजर होते. तसेच दुपारच्या सत्रात ६८ उमेदवारांनी परीक्षा दिली तर २६ जण गैरहजर होते. परीक्षा सुरळीत पार पडावी यासाठी ३१ अधिकारी, कर्मचाऱ्यांनी केंद्रावर आपले कर्तव्य बजावले.रविवारपासून सुरू झालेल्या मुख्य परीक्षांची शहरात दिपा इंग्रजी प्राथमिक शाळा, साईनगर येथे १ केंद्र असून, याठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त ही लावण्यात आला होता. परीक्षा सुरळीत व शांततेत पार पडल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.
असे आहे मुख्य परीक्षेचे वेळापत्रक
५ एप्रिल : भाषा विषयक पेपर १ आणि २
१८ एप्रिल : निबंध
१९ एप्रिल : सामान्य अध्ययन १ आणि २
२६ एप्रिल : सामान्य अध्ययन ३ आणि ४
२ मे : वैकल्पिक विषय - दोन्ही पेपर
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी