बारामतीतून माघार घेण्यासाठी काँग्रेस उमेदवार आकाश मोरेंनी ठेवली अट
पुणे, 06 एप्रिल (हिं.स.)। बारामती विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होत असून यासाठी महायुती राष्ट्रवादीकडून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार उमेदवार आहेत. अजित पवार यांच्या निधनानंतर होत असलेली ही निवडणूक बिनविरोध व्हावी असं आवाहन महायुतीने केलंय. तरीही क
nagfd


पुणे, 06 एप्रिल (हिं.स.)।

बारामती विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होत असून यासाठी महायुती राष्ट्रवादीकडून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार उमेदवार आहेत. अजित पवार यांच्या निधनानंतर होत असलेली ही निवडणूक बिनविरोध व्हावी असं आवाहन महायुतीने केलंय. तरीही काँग्रेससह काही उमेदवारांकडून अर्ज दाखल करण्यात येत आहेत. सुनेत्रा पवार यांनी विनंती केल्यानंतरही काँग्रेसनं उमेदवार जाहीर केला आहे.

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी पाच इच्छुकांपैकी आकाश मोरे यांच्या नावावर रविवारी शिक्कामोर्तब केलं. त्यानंतर महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आकाश मोरे यांचं नाव जाहीर केलं. बारामती पोटनिवडणुकीसाठी आतापर्यंत तब्बल १९ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. सोमवारी सुनेत्रा पवार आणि आकाश मोरे हे दोघेही अर्ज दाखल करणार आहेत. दरम्यान, पोटनिवडणुकीतून माघारीसाठी काँग्रेसनं अट ठेवली असल्याचं सांगण्यात येतंय.

बारामतीत काँग्रेसनं उमेदवारी दिलेल्या आकाश मोरे यांनी माघार घेण्यासाठी अट ठेवली आहे. त्यांनी म्हटलं की, पोटनिवडणूक ही लोकशाही टिकवण्यासाठी लढत आहोत. आमचा मूळ शत्रू भाजप आहे. याशिवाय अजित पवार यांच्या विमान अपघाताचा तपास हा मुद्दासुद्धा आहे. याच मुद्द्याला वाचा फोडण्यासाठी आम्ही निवडणूक लढवत आहोत. अजित पवारांच्या अपघात प्रकरणी गुन्हा दाखल केल्यास आम्ही उमेदवारी माघारी घेऊ.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande