चंद्रपूर: खरीप हंगामासाठी २० हजार टन साठा युरिया उपलब्ध
चंद्रपूर, 06 एप्रिल (हिं.स.)। जिल्ह्यात दर वर्षी खरीप हंगामासाठी सुमारे ५० हजार टन युरियाची गरज भासत असून यंदा सध्या २० हजार टन साठा उपलब्ध आहे. परिणामी तातडीने टंचाई निर्माण होण्याची शक्यता नसल्याचे कृषी विभागाने स्पष्ट केले आहे. दरम्यान त्यामुळे
चंद्रपूर: खरीप हंगामासाठी २० हजार टन साठा युरिया उपलब्ध


चंद्रपूर, 06 एप्रिल (हिं.स.)।

जिल्ह्यात दर वर्षी खरीप हंगामासाठी सुमारे ५० हजार टन युरियाची गरज भासत असून यंदा सध्या २० हजार टन साठा उपलब्ध आहे. परिणामी तातडीने टंचाई निर्माण होण्याची शक्यता नसल्याचे कृषी विभागाने स्पष्ट केले आहे. दरम्यान त्यामुळे शेतकऱ्यांनी घाईघाईने किंवा भीतीपोटी खत साठवणूक करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

सध्या शेतकरी खरीप हंगामाच्या पूर्वतयारीत व्यग्र असून, गरजेनुसारच खत खरेदी करण्याकडे त्यांचा कल दिसून येत आहे. बाजारातही सध्या स्थिरता असून अनावश्यक साठेबाजी किंवा आगाऊ खरेदीचे प्रमाण कमी असल्याचे चित्र आहे. मात्र, काही ठिकाणी अनावश्यक साठेबाजी होऊ नये, यासाठी प्रशासनाने दक्षता बाळगण्याच्या सूचना दिल्या आहेत.

कृषी अधिकाऱ्यांनी खत विक्रीत पारदर्शकता राखण्याचे निर्देश देत शेतकऱ्यांना आवश्यकतेनुसार आणि योग्य प्रमाणात खत उपलब्ध करून देण्यावर भर देण्यास सांगितले आहे. तसेच, कोणत्याही विक्रेत्याने किंवा शेतकऱ्याने जास्त प्रमाणात खत खरेदी करून साठा करून ठेवू नये, यासाठी विक्रीपूर्वी खात्री करणे बंधनकारक करण्यात आले आहे.

दरम्यान, खरीप हंगाम जवळ येत असल्याने पुढील काही आठवड्यांत खताची मागणी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे उपलब्ध साठ्याचे योग्य नियोजन करून गरजेनुसार पुरवठा सुनिश्चित करण्याचे निर्देश प्रशासनाने दिले आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / एम.पंकजराव


 rajesh pande