
नांदेड, 06 एप्रिल (हिं.स.)।
श्री दत्त शिखर संस्थानचे महंत मधुसूदन भारती गुरु अच्युत भारती महाराज (९३) यांचे निधन झाले. दिवंगत महंत अच्युत भारती महाराज यांच्या पश्चात १९७८ साली विधिवत प्रक्रियेनुसार मधुसूदनजी भारती महाराज गादीवर विराजमान झाले होते. तब्बल ४ तप म्हणजे ४८ वर्षे त्यांनी गादीवर राहून तप, साधना आणि अध्यात्मिक सेवेत आयुष्य व्यतीत केले.
दरम्यान, शिखर संस्थानच्या प्राचीन परंपरेनुसार नवीन महंत निवडीसाठी 'ईश्वर चिठ्ठी' पद्धतीने निवड प्रक्रिया पार पडली. या धार्मिक आणि पारंपरिक सोहळ्यात डॉ. धनेश्वर उर्फ श्याम भारती महाराज यांची ३१दत्त शिखर संस्थानच्या ३१ व्या महंताची निवड
करण्यात आली व महंतपदी निवड करण्यात आली.
ही निवड प्रक्रिया अत्यंत भक्तिमय वातावरणात पार पडली. यावेळी संस्थानचे विश्वस्त, पुजारी, प्रशासनातील अधिकारी तसेच मोठ्या संख्येने दत्तभक्त उपस्थित होते. नवीन महंतांच्या निवडीमुळे दत्तभक्तांमध्ये समाधान व्यक्त होत असून, संस्थानची परंपरा आणि अध्यात्मिक वारसा अधिक बळकट होईल, अशी भावना व्यक्त होत आहे.
श्री दत्तात्रय संस्थान शिखर मुख्य महंत परंपरा १. महंत श्री शामसुंदर भारती (इ.स. ७५९ ते १२५९. ५०० वर्षे).२. महंत मनमुकंद भारती (१२५९ ते १२९०. ३१ वर्षे). ३ महंत नारसिंग भारती (१२९० ते १३२१. ३१ वर्षे) ४. महंत पिरपरमरानंद भारती (१३२१ ते १३५२. ३१ वर्षे). ५.. महंत मान भारती (१३५२ ते १३६५.१३ वर्षे). ६. महंत महेश भारती (१३६५ ते
१४०५. ४० वर्षे). ७... महंत हरीहर भारती (१४०५ ते १४४१. ३६ वर्षे). ८... महंत गंगा भारती (१४४१ ते १४७१.३० वर्षे). ९. महंत परमानंद भारती (१४७१ ते १५१५. ४४ वर्षे). १०. महंत देव भारती (१५१५ ते १५४८. ३३ वर्षे). ११. महंत विश्वेश्वर भारती (१५४८ ते १५७३.२५ वर्षे). १२.. महंत चिंतामण भारती (१५७३ ते १५८६.१३ वर्षे). १२. महंत सदानंद भारती (१५८६ ते १६०५, १९ वर्षे) १३. महंत गणेश भारती (१६०५ ते १६३५.३० वर्षे). १४. महंत प्रयाग भारती (१६३५ ते १६५०.१५ वर्षे). १५. महंत शंकर भारती (१६५० ते १६७१.२१ वर्षे.). १६.. महंत केशव भारती (१६७१ ते १६८२.११ वर्षे). १७... महंत गोपाल भारती (१६८२ ते १६८८. ६ वर्षे). १८. महंत वैष्णव भारती (१६८८ ते १६९५. ७ वर्षे).
---------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis