
बीड, 06 एप्रिल (हिं.स.)।
उचलीच्या वसुलीसाठी कारमधून आलेल्या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल साखर कारखान्याकडून
घेतलेल्या उचलीच्या वसुलीसाठी तालुक्यातील घाटनांदूर येथून एका ऊसतोड कामगार मुकादमाचे अपहरण केल्याची घटना घडली. या प्रकरणी अंबाजोगाई ग्रामीण पोलिस ठाण्यात रात्री उशिरा अपहरणाचा गुन्हा दाखल झाला आहे.
साखर कारखान्याला ऊसतोड कामगार पुरविणारा ऊसतोड मुकादम यांनी
कारखान्याकडून उचल घेतली होती. या उचलीची वसुली करण्यासाठी काही लोक आले होते. घरातून दुचाकी घेऊन बाहेर गेल्यावर शासकीय गोदाम परिसरात असलेल्या विद्युत डी. पी. जवळ आले. यावेळी त्यांच्या पाळतीवर असलेल्या पांढऱ्या रंगाच्या कारमधून आलेल्या तीन जणांनी मिळून यांना उचलून कारमध्ये टाकून पळवून नेले. फिर्यादीवरून अंबाजोगाई ग्रामीण पोलिस ठाण्यात अपहरणप्रकरणी गुन्हा दाखल नोंद झाला आहे. तपास सहायक पोलिस निरीक्षक असद शेख करत आहेत.
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis