
बीड, 06 एप्रिल (हिं.स.)।
नेपाळचे कुस्तीपटू देवा थापा यांनी अवघ्या दहा मिनिटांत चितपट कुस्ती करत ७५ हजारांचा बक्षीस पटकावले आहे. कुस्ती शौकिनाच्या डोळ्याचे पारणे फेडल्याचे आखाड्यात दिसून आले.
आष्टी तालुक्यातील धामणगाव येथे यात्रोत्सवानिमित्त आयोजित कुस्ती आखाड्यात नेपाळ येथील प्रसिद्ध मल्ल देवा थापा विरुद्ध उत्तराखंड येथील आशिष हुडा या दोन मल्लांत ७५ हजार रुपयांचे बक्षीस ठेवलेली कुस्ती निकाली निघाली. देवा थापाने यांनी केवळ दहा मिनिटांत कुस्तीच्या डावावर उत्तराखंड
येथील पहिलवान आशिष हुडा याला चितपट करत रोख ७५ हजारांचा इनाम पटकावला आहे यात्रोत्सव कमिटीच्या वतीने चेअरमन संजय गाढवे, सरपंच मनोज गाढवे, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांच्या वतीने नियोजन करण्यात आले होते. उत्कृष्ट सदरील कुस्ती प्रसंगी
आमदार सुरेश धस, माजी आमदार भीमराव धोंडे, महाराष्ट्र केसरी सय्यद चाऊस, जयदत्त धस, जामगावचे सरपंच श्याम धस, सतीश शिंदे, बापूसाहेब डोके, हभप भागचंद होते. झांजे, पोलिसपाटील पवन चौधरी, रमेश गावडे, कापशीचे सरपंच बाळासाहेब गर्जे, यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis