केज-अंबाजोगाई रस्त्यावर एसटी बस आणि दोन कारचा भीषण अपघात; तिघे जखमी
बीड, 06 एप्रिल (हिं.स.)। केज येथील पिसेगाव फाट्याजवळ दोन कार आणि एसटी बसचा भीषण तिहेरी अपघात झाला. पेट्रोल पंपाकडे वळणाऱ्या एका अज्ञात वाहनामुळे पाठीमागील स्विफ्ट आणि रिट्झ कारने आपला वेग कमी केला होता. याच वेळी पाठीमागून येणाऱ्या भरधाव अंबाजोगाई
अ


बीड, 06 एप्रिल (हिं.स.)।

केज येथील पिसेगाव फाट्याजवळ दोन कार आणि एसटी बसचा भीषण तिहेरी अपघात झाला. पेट्रोल पंपाकडे वळणाऱ्या एका अज्ञात वाहनामुळे पाठीमागील स्विफ्ट आणि रिट्झ कारने आपला वेग कमी केला होता. याच वेळी पाठीमागून येणाऱ्या भरधाव अंबाजोगाई-संभाजीनगर एसटी बसने या दोन्ही कारला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात दत्ता लांडगे, विनोद जगताप आणि एसटी चालक मारुती फड हे तिन्ही जखमी झाले आहेत. सुदैवाने, बसमधील १७ प्रवासी सुखरूप बचावल्याने मोठी जीवितहानी टळली असली तरी स्विफ्ट कारचा मात्र चेंदामेंदा झाला आहे. अपघातास कारणीभूत ठरलेला एक कार चालक घटनास्थळावरून फरार झाला असून जखमींवर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दैव बलवत्तर म्हणून मोठा अनर्थ टळल्याची भावना प्रत्यक्षदर्शींनी व्यक्त केली आहे.

पेट्रोल पंपाकडे वळणाऱ्या एका अज्ञात वाहनामुळे पाठीमागील स्विफ्ट आणि रिट्झ कारने आपला वेग कमी केला होता असे सांगण्यात आले

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande