
जम्मू, ६ एप्रिल (हिं.स.). काश्मीर खोऱ्याला उर्वरित भारताशी जोडणारा जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्ग-४४ भूस्खलनामुळे बंद करण्यात आला आहे. करोल ब्रिज आणि चंदर कोट दरम्यान प्रचंड भूस्खलन झाले. आज पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास डोंगरावरून दगड कोसळले आणि चिखलाच्या ढिगाऱ्यांमुळे महामार्गाच्या दोन्ही बाजू बंद झाल्या आहेत.
सध्या, जम्मू ते श्रीनगर आणि श्रीनगर ते जम्मू प्रवास करणारी वाहने विविध ठिकाणी अडकून पडली आहेत. हा २४७ किलोमीटर लांबीचा महामार्ग भारतातील सर्वात लांब राष्ट्रीय महामार्ग आहे. तो जम्मूपासून सुरू होतो आणि उधमपूर, रामबन (रामसू) आणि बनिहालमार्गे श्रीनगरपर्यंत जातो.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे