नगरसेवकानेच केला तिघांवर कोयत्यानं हल्ला, २० जणांवर गुन्हा दाखल
सोलापूर, 06 एप्रिल (हिं.स.)। पंढरपुरात नगरसेवकानेच तिघांवर हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडलीय. या प्रकरणी नगरसेवकासह २० जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. पंढरपुरात घडलेल्या या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. आरोपी नगरसेवक हा भालके गटाच्या तीर्थक्षे
नगरसेवकानेच केला तिघांवर कोयत्यानं हल्ला, २० जणांवर गुन्हा दाखल


सोलापूर, 06 एप्रिल (हिं.स.)।

पंढरपुरात नगरसेवकानेच तिघांवर हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडलीय. या प्रकरणी नगरसेवकासह २० जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. पंढरपुरात घडलेल्या या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. आरोपी नगरसेवक हा भालके गटाच्या तीर्थक्षेत्र विकास आघाडीचा असल्याची माहिती समोर आलीय.

नगरसेवक लोकेश यादव याने तिघांवर कोयत्याने वार केलाय. यामध्ये तिघे जण जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर पोलिसांनी या प्रकरणी लोकेश यादव, माजी नगरसेवक नागेश यादव यांच्यासह २० जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

नगरसेवकाकडूनच कोयत्यानं हल्ला झाल्याच्या घटनेनं आता अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. या घटनेनं परिसरात भीतीचं वातावरण निर्माण जालं आहे. आरोपींवर कठोरता कठोर कारवाई करावी अशी मागणी होत आहे. नगरसेवकाने भिशीवरून वाद घातल्याची माहिती समोर येतेय.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande