
बीड, 06 एप्रिल (हिं.स.)।
महसूल विभागाच्या सुधारित
आकृतीबंधाला शासनाने मान्यता दिली असून, जिल्ह्यातील बीड आणि आष्टी तालुक्यात नवीन अपर तहसील कार्यालयांना मान्यता देण्यात आली आहे या कार्यालयात नियमित ७ पदे राहतील. तसेच मंडळ हा घटक समजला
जाणार आहे. त्यानुसार एकाच मंडळाचे मूळचे तहसील कार्यालय व अपर तहसील कार्यालयात विभाजन करु नये, संपूर्ण मंडळ एकाच कार्यालयाकडे राहील, याची दक्षता घेण्याचे निर्देश आहेत. यासंदर्भात जिल्हाधिकारी लवकरच प्रारुप अधिसूचना प्रसिद्ध करतील. त्यानंतर अंतिम अधिसूचना शासनाकडून काढण्यात येणार आहे.
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis