अमरावती पोलिसांनी निर्जनस्थळी वाढविली गस्त
अमरावती, 06 एप्रिल (हिं.स.) महाविद्यालयीन युवती मित्रासोबत फिरायला गेली असता तिच्यावर अत्याचार करून दोघांकडून ऐवज लुटल्या गेला. या घटनेला शहर पोलिसांनी गांभीर्याने घेतले असून पोलिस आयुक्तालयापासून दहा ते बारा किलोमीटरच्या आत येणाऱ्या निर्जनस्थळी प
अमरावती पोलिसांनी निर्जनस्थळी वाढविली गस्त


अमरावती, 06 एप्रिल (हिं.स.)

महाविद्यालयीन युवती मित्रासोबत फिरायला गेली असता तिच्यावर अत्याचार करून दोघांकडून ऐवज लुटल्या गेला. या घटनेला शहर पोलिसांनी गांभीर्याने घेतले असून पोलिस आयुक्तालयापासून दहा ते बारा किलोमीटरच्या आत येणाऱ्या निर्जनस्थळी पोलिस उपायुक्त व संबंधित ठाण्याचे निरीक्षक यांनी नुकत्याच भेटी दिल्या. अशा ठिकाणाचे काही छायाचित्रही अधिकाऱ्यांनी काढून घेतले आहे. दिवसभर अशा ठिकाणी हद्दीपर्यंत सीआर व्हॅन, दामिनी पथकासह संबंधित ठाण्याचे नियमित गस्तीवर असलेले वाहन फिरणार आहे. अशा निर्जनस्थळी युवक-युवती संशयास्पद स्थितीत आढळल्यास त्यांची चौकशी संबंधित गस्तीवर असलेले पोलिस कर्मचारी करणार आहेत. निर्जनस्थळी लुटण्याच्या तयारीत आणि संशयास्पदस्थितीत फिरणाऱ्यांवरही त्यामुळे वचक राहील, असे पोलिस उपायुक्त गणेश शिंदे यांनी सांगितले. तरुण युवक-युवतींनी अशा निर्जनस्थळी फिरायला जाताना स्वत:च्या सुरक्षेची काळजी घ्यावी, असे आवाहन पोलिस उपायुक्त गणेश शिंदे यांनी केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande