सोलापूर : तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
सोलापूर, 06 एप्रिल (हिं.स.) : गावातील यात्रेच्या दिवशी शेतात पाणी देण्यास सांगितल्याने रागाच्या भरात १६ वर्षीय मुलाने शेतात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना दक्षिण सोलापूर तालुक्यातील कासेगाव येथे घडली आहे.हरिदास अशोक मोरे (वय १६)
sdfg


सोलापूर, 06 एप्रिल (हिं.स.) : गावातील यात्रेच्या दिवशी शेतात पाणी देण्यास सांगितल्याने रागाच्या भरात १६ वर्षीय मुलाने शेतात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना दक्षिण सोलापूर तालुक्यातील कासेगाव येथे घडली आहे.हरिदास अशोक मोरे (वय १६) असे या तरुणाचे नाव आहे. रविवारी गावात यात्रा (जत्रा) भरली होती. शेतात पीक लावले असल्याने उन्हाळ्यात ते खराब होऊ नये, म्हणून वडिलांनी हरिदासला शेतात पाणी घालण्यास सांगितले होते. मात्र, यात्रेच्या दिवशी शेतात का जाऊ? असे म्हणत हरिदास रागावला. त्यानंतर तो मित्राच्या गाडीवरून शेतात गेला. त्याचा राग पाहून कुटुंबीयांना संशय आला. वडिलांनी त्याचा भाऊ थोड्या वेळाने शेतात पाठवला. मात्र, तेव्हापर्यंत हरिदासने शेतातील पत्र्याच्या शेडमध्ये लोखंडी अँगलला दोरी बांधून गळफास घेतला होता. हे पाहताच भावाने दोरी कापून त्याला खाली उतरवले आणि लगेच वडिलांना बोलावले. नंतर त्याला तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेची नोंद सिव्हिल पोलिस चौकीत करण्यात आली आहे. हरिदासच्या पश्चात आई, वडील, एक लहान भाऊ आणि एक मोठा भाऊ असा परिवार आहे.हरिदासला लहानपणापासून कुस्तीची आवड होती. तो दररोज व्यायाम करायचा. काही महिन्यांपूर्वी झालेल्या शालेय कुस्ती स्पर्धेत ६२ किलो वजनी गटात तो जिल्ह्यात प्रथम आला होता. यामुळे राज्यस्तरावर त्याची निवड झाली होती, अशी माहिती नातेवाईकांनी दिली. पण गावात चर्चा ऐकली असता मयत हरिदास याने घरच्यांकडे महागड्या मोबाईलची मागणी केली होती, तो घेऊन न दिल्याने असे पाऊल उचलले असेल अशी कासेगावात ग्रामस्थांमधून चर्चा सुरू होती.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande