सोलापूरात जिल्हाधिकारी सोमवार आणि शुक्रवारी सर्वसामान्यांना भेटणार
सोलापूर, 06 एप्रिल (हिं.स.)। तत्कालीन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद हे सर्वसामान्यांना सोमवारी व शुक्रवारी दुपारी ३ ते सायंकाळी ५ या वेळेत भेटत होते. दरम्यानच्या काळात विषयाचे गांभीर्य पाहून सर्वसामान्यांची भेट, सर्वसामान्यांच्या प्रश्नावर संबंधित व
Collctor


सोलापूर, 06 एप्रिल (हिं.स.)।

तत्कालीन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद हे सर्वसामान्यांना सोमवारी व शुक्रवारी दुपारी ३ ते सायंकाळी ५ या वेळेत भेटत होते. दरम्यानच्या काळात विषयाचे गांभीर्य पाहून सर्वसामान्यांची भेट, सर्वसामान्यांच्या प्रश्नावर संबंधित विभागाला सूचना दिल्या जात होत्या. जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी हीच पद्धत कायम ठेवली आहे. सर्वसामान्यांना त्यांचे प्रश्न घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयात येण्याची वेळच पडू नये, प्रशासन आणखी सतर्क व तत्पर करण्यासाठी जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांच्याकडून प्रभावी उपाययोजना राबविल्या जाण्याची शक्यता आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande