
नांदेड, 06 एप्रिल (हिं.स.)। राज्यातील विविध गाव, तांड्यावर राहत असलेल्या बंजारा समाजातील विधूर, विधवा, घटस्फोटितांचे संसार पुन्हा उभे राहावेत, समाजातील कुटुंब व्यवस्था मजबूत व्हावी, या उद्देशाने प्रथमच बंजारा समाजातील विधूर, विधवा, घटस्फोटितांसाठी येत्या १२ एप्रिलला सकाळी ११ ला हॉटेल ग्रँड मराठा, छत्रपती चौक, नांदेड येथे मोफत परिचय मेळावा होणार आहे.
शीतल संजय राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली दत्ता राठोड यांच्यातर्फे प्रथमच हा मेळावा होत आहे. बंजारा समाजाने आधुनिक काळात शिक्षणाची कास धरल्याने विकासाच्या मुख्य प्रवाहात सामील होत असताना तांड्यातील सहजीवन आणि एकत्रित कुटुंब व्यवस्थेपासून हा समाज आता काहीअंशी दुरावताना दिसत आहे. शिक्षण, रोजगार मिळविण्यासाठी अनेक वर्षे खर्ची पडत आहेत. त्यातच लग्न झाल्यानंतर पुन्हा या ना कारणाने नात्यात दुरावा येतो. त्यामुळे विधवा, विधूर, घटस्फोटितांसाठी हा मेळावा होणार असून, माहितीसाठी दत्ता राठोड (८०५५८८८८५५) यांच्याशी संपर्क करण्याचे आवाहन केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis